आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदाराला रस्त्याच्या मातीत पुरेन; नितीन गडकरी यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैतुल -‘रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यास ठेकेदाराला त्याच रस्त्याच्या मातीत पुरेन,’ असा इशारा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिला. मध्य प्रदेशमधील बैतुल येथे तेंदूपत्ता बोनस वितरण कार्यक्रमात ते म्हणाले की, याच कारणामुळे माझ्या मंत्रालयात कोणत्याही कामात भ्रष्टाचार झाला नाही.


गडकरी म्हणाले की, रस्त्याचे जाळे तयार करण्यासाठी निधीची कमतरता येऊ देणार नाही. मी फक्त घोषणा करत नाही तर ती पूर्ण करूनच दाखवतो. सिंचनासाठी आमचे सरकार खूप चांगले काम करत आहे. आता कालव्यांद्वारे नव्हे तर पाइपने शेतांत पाणी पोहोचवू. 


मंचावर आला घाम, त्वरित उपचार 

भाषणानंतर गडकरी मंचावर बसले तेव्हा त्यांना घाम येऊ लागला, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना सुरक्षा वाहनात नेण्यात आले आणि एसीमध्ये बसवण्यात आले. त्यांना गोड पदार्थही खाऊ घालण्यात आला. थोड्या वेळानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉक्टरांंच्या मते, बहुधा त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...