आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल झाली दांम्पत्याची सुसाइड नोट, लिहिले- पैसे मिळाले तर मुलाला द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार (हरियाणा)- बंसल दांमत्याच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी सर्व पाच आरोपींना अटक करण्यासाठी त्यांचे गाव ढंढेरी आणि रामायण येथे धाड टाकाली. संशयित ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली, परंतु आरोपींचा काहीच सुगावा लागला नाही. तसेच, पोलिसांनी मृतांजवळ एक नोट मिळाली होती, या काही हिशोब लिहिलेला होता. याच प्रकरणी मृत संजय बंसलने लिहिलेली सुसाइड नोट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.


काय लिहिले होते सुसाइड नोटमध्ये...?
- नोटमध्ये लिहिले होते - मी संजय बंसल. जर या लोकांकडून (आरोपींकडून) पैसे, संपत्ती आणि गाडी मिळाली तर ते सर्व माझा मुलगा आयुषच्या नावावर करण्यात यावे, तो सुभाष (आजोबा) कडे राहतो. आमची स्कूटी देखील सुभाषला देऊन टाका.
- सत्यवान मलिक व्यावसायात पार्टनर होता. त्याने सर्व पैसे खाल्ले. लालाजी म्हणजे सुभाषकडून पैसे मागण्याचा त्याने तगादा लावला होता. त्यांचे काहीच देणे-घेणे नव्हते, तो आम्हाला देखील धमकी देत होता.
- लालजीला देखील मारण्याची धमकी देत आहेत, ते डिंपलचे वडिल आहेत. सत्यवानकडून पैसे आणि सोण्याच्या वस्तू घेूऊन टाका.


पत्नीने आधी संजयला थांबवले, नंतर दोघांनी मिळून केली आत्महत्या....
- घटनेच्या वेळी संजय बंसल ट्रेनच्या पुढे उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, तेढ्यात डिंपलने त्याचा हात पकडून त्याला ओढले. याचा खुलासा घटनास्थळाहून काही अंतरावर बसलेल्या एका व्यक्तीने केला. ही गोष्ट त्याने घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांना दिली होती.
- त्याने सांगितेल की, दोघेही खुप वेळ स्कूटी उभी करून चक्कर मारत होते. ट्रेन येताच संजय बंसल उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या पत्नीने त्याला हात पकडून खेचले. यानंतर दोघांनी दुसरी ट्रेन येताच सोबत ट्रेनसमोर उडी मारली.


मृतांचे कुटुंबीय पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये...
गुरूवारी मृत डिंपल उर्फ अर्पिता बंसलचे वडिल सुभाष व इतर काही नातेवाइक रेल्वे स्टेशन ठाण्यात पोहेचले.
- पोलिसांनी आरोपींच्या अटकेविषयी विचारले तेव्हा, आद्याप कुणीही हाती लगाले नाही असे उत्तर मिळाले. पोलिस अधिकारी हरपाल सिंह यांनी सांगितले की, टीम तपास करत आहे, लवकरच खरे काय ते समोर येईल.
- डिंपले बंसलने आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना व्हिडिओ मेसेज पाठवला होता. संजय बंसलने एक नोट लिहिली होती.
- दोघांनी घरापासून 10 किमी अंतरावरील रायपूर स्टेशनजवळील लुधियाना ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पाच लोकांवर आत्महत्येस मजबूर केल्याचा आरोपा आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...