आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर सभेतील लाचेच्या विधानावरून केजरीवाल यांना न्यायालयाची नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मतदारांना लाच घेण्याचे वादग्रस्त वक्तव्य करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना  स्थानिक न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मापुसा शहरातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही नोटीस केजरीवाल यांना शुक्रवारी पाठवण्यात आली.

 

जानेवारी २०१७ मध्ये निवडणूक आयोगाने केजरीवाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. मतदारांनी कोणत्याही पक्षाकडून मिळणारे पैसे घ्यावेत, परंतु मतदान आपल्या सोयीने करावे, असे वक्तव्य जाहीरपणे केले होते. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. ७ ते ८ जानेवारी दरम्यान त्यांनी गोव्यात अनेक जाहीर सभा घेतल्या होत्या. भाजप किंवा काँग्रेसने पैसे देऊ केल्यास ते जरूर घ्या. परंतु मतदान मात्र आम आदमी पक्षालाच करा, असे त्यांनी सभेत म्हटले होते. तेव्हा आपने ४० पैकी ३९ मतदारसंघांतून उमेदवार उभे केले होते.  

बातम्या आणखी आहेत...