आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- गुजरातमध्ये चार वर्षापूर्वी लग्न केलेल्या जोडप्यात वैवाहिक सुखाच्या अधिकारावरून कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या प्रकरणात अखेर तडजोड झाली. हे प्रकरण उत्तर गुजरातचा एक व्यापारी पती व वडोदराच्या शाळेत नोकरीस असलेल्या शिक्षिका पत्नीचे होते.
दोघेही वेगवेगळ्या शहरात राहात असल्याने त्यांना वैवाहिक सुख मिळत नव्हते. पतीने कौटुंबिक न्यायालयात अर्ज करून न्याय देण्याची याचना केली. याचिकेत त्याने म्हटले, पत्नीची सरकारी नोकरी त्यांच्या वैवाहिक जीवनात अडसर ठरत आहे. पत्नी नोकरीस प्राधान्य देते. कृपया, माझ्या पत्नीची समजूत काढा. विवाहानंतरही ती माहेरी राहून नोकरी करत आहे. कौटुंबिक न्यायालयातील मध्यस्थाने दांपत्यास म्हटले, वैवाहिक आयुष्य जगण्याचा प्राप्त करायचा असेल तर पत्नीने शनिवारी व रविवारी पतीच्या घरी जावे. इतर दिवसात व्यापारी पती तिच्याकडे जाऊ शकतो. हा प्रस्ताव दोघांनाही मान्य झाला आणि पतीने पत्नीला न्यायालयातूनच घरी नेले. पती-पत्नीच्या आयुष्यास नव्याने सुरूवात झाली. घटस्फोट मात्र होता होता टळला.
परिश्रमाने मिळालेली नोकरी कशी सोडू?
न्यायालयात मध्यस्थाने सांगितले, पत्नीची सुटी असेल म्हणजे शनिवारी व रविवारी ती पतीकडे जाईल व पतीला वेळ मिळेल तसा तो इतर दिवशी पत्नीकडे जाईल. पत्नीने वडोदरा येथे किरायाने वेगळे घरही घेतले. नोकरीमुळे ती सासरी जाऊ शकत नव्हती. माझी सरकारी नोकरी असल्याने ती साेडू शकत नाही. सरकारी नाेकरी परिश्रमाने मिळते. ती कशी सोडू? असे पत्नीचे म्हणणे होते. पतीच्या गावी बदली मागितली आहे. त्याचीच वाट पाहते आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.