आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो घरात घुसून तिच्यावर दुष्कर्म करत होता, तेवढ्यात कुटुंबीयांनी पाहिले अन्...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- येथे गेल्या रात्री एका तरूणाने घरात घुसून एका तरूणीवर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला, यामुळे तरूणीने स्वत:वर रॉकेल टाकून पेटवून घेतले. सध्या तरूणीला  उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, तरूण घरात घुसला होता, घटनेनंतर जमलेल्या लोकांनी तरूणाची चांगलीच धुलाई केली. आद्याप तरूणीचा जबाब नोंदवण्यात आला नाही. तिचा जबाब नोंदवल्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल...


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- शहातील मुरलीपूरा परिसरात दारूच्या नशेत एक तरूण घरात घुसला.
- आरोपीने तरूणीसोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. यावर तरूणीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारील लोक धावत आले. त्यानी समोरील दृष्य पाहताच ते संतापले आणि त्यांनी आरोपीला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. लोकांनी त्याला एवढी मारहाण केली, की त्याचे हात पाय तुटले.


तरूणीने स्वत:ला पेटवले...
- सर्व लोक आरोपीची धुलाई करत होते. तेवढ्यात तरूणीने आपल्या शरिरावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.
-  लोकांना जेव्हा याविषयी कळाले तोपर्यंत तिला चांगलीच होरपळली होती. लोकांनी चादर टाकून आग विझवली आणि तिला उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले. तरूणीची अवस्था गंभीर असल्याच सांगण्यात येत आहे.

 

आरोपी दारूच्या नशेत होता...
पोलिसांनुसार आरोपी दारूच्या नसेत होता. लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. तो अद्याप जबाब देखील नोंदवू शकला नाही. तसेच तरूणीचा देखील जबाब आद्याप नोंदवता आला नाही. त्यामुळे तरूणीने जबाब दिल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होईल...


फोटो : ओम शर्मा

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...