आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाईकवर जाणारे 6 जण ट्रकच्या धडकेने कोसळले; दोन फूट लांब पडला मुलाचा तुटलेला पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो तुम्हाला विचलित करू शकतो. - Divya Marathi
फोटो तुम्हाला विचलित करू शकतो.

करोली (जयपूर) - बाइकवर जाणाऱ्या कुटुंबाला ट्रकने मागून धडक दिली आणि सर्व काही उध्वस्त झाले. अपघाताच्या वेळी बाईकवरून तब्बल 6 जण प्रवास करत होते. धडकेनंतर सर्वच जण इकडे तिकडे पडले. तर यापैकी एका मुलाचा पाय तुटला आणि तो त्याच्यापासून दोन फूट अंतरावर जाऊन पडला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पती-पत्नी आणि मुलासह 4 जण गंभीर असून त्यांना जयपूरला उपचारासाठी पाठवले आहे. 


हा अपघात सोमवारी झाला असल्याचे समोर येतेय. करोली जिल्ह्याच्या रतियापुरा येथील बबलू मीना, पत्नी सुनिता, मुलगा अंश, भाऊ रोहित, बहीण प्रियंका आणि भाची पद्माबरोबर सालीच्या लग्नासाठी जात होते. एकाच वाईकवरून हे सर्व जात असताना अपघात झाला. 


खरं तर अपघाताचा हा फोटो तुम्हाला विचलित करू शकतो. पण त्याचवेळी सर्वांनी यातून धडा घेणेही गरजेचे आहे. ओव्हरलोडींग आणि हायस्पीड घातक ठरू शकतात. पोलिस आणि प्रशासनाने कारवाई केली किंवा नाही केली तरी, आपण स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. जराही चूक झाली तरी आपला जीव धोक्यात येऊ शकतो. 

 

बातम्या आणखी आहेत...