आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लीम महिलांनी फूटबॉल बघणे इस्लामच्या विरोधात; दारूल उलूम देवबंदच्या मुफ्तींचा फतवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबमधील जेद्दाह येथे फुटबॉल पाहणाऱ्या मुस्लीम महिला. - Divya Marathi
सौदी अरबमधील जेद्दाह येथे फुटबॉल पाहणाऱ्या मुस्लीम महिला.

लखनौ- पुरूषांचे फूटबॉलचे सामने मुस्लीम महिलांनी बघू नयेत असा फतवा दारूल उलूम देवबंदच्या मुफ्तींनी काढला आहे. अर्ध्या पँटमध्ये पुरूष फूटबॉल खेळतात, त्याखाली त्यांचे शरीर उघडे असते, अशा पुरूषांना बघणे इस्लामच्या शिकवणुकीविरोधात असल्याचे मुफ्ती अतहर कासमी यांनी म्हटले आहे. मुस्लीम महिलांनी त्यामुळे पुरूषांचे फूटबॉल सामने बघू नयेत असा फतवा त्यांनी काढला आहे. 

 

तुम्ही देवाला घाबरता की नाही? असा सवाल विचारत बायकांना असे काही  बघूच कसे देतात असा प्रश्न त्यांनी मुस्लीम पुरुषांना विचारला आहे. महिलांना फूटबॉलचे सामने बघण्याची गरजच काय असा प्रश्नही कासमींनी विचारला आहे. दारूल उलूमच्या या फतव्याचा लखनौ शहरातील मुस्लीम महिलांच्या संघटनांनी निषेध केला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...