आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या मुलीच्या लग्नासाठी आईने घर विकले, तिनेच हातात 60 रूपये देऊन रस्त्यावर सोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- येथील गोलागंज परिसरातील मजारजवळ 85 वर्षाच्या वृद्ध महिलेला तिची विवाहीत मुलगी 5 डिसेंबला एकटीला सोडून पळून गेली. दोन तास ती मजार जवळ अशीच बसून होती. कोणीतरी फोन करून हेल्पेज इंडीया संस्थेच्या लोकांना याविषयी कळवले, त्यानंतर त्यांनी तिच्यावर उपचार केलेत. महिलेच्या साडीत 60 रूपये बांधलेले होते आणि काही महत्वाचे कागद देखील होते. या आधारावरून संस्थेचे लोक महिलेला तिच्या कुटुबीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.


जाणीवपूर्वक तर नाही सोडले?
- हेल्पेज इंडियाच्या सदस्यांनी सांगितले की, महिलेला ज्या अवस्थेत गोलगंज येथून उचलून ओल्डएज होममध्ये आणण्यात आले आणि तिच्याजवळ जे साहित्य सापडले त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात. एवढ्या रात्री ही महिला आपले घर सोडून गोलागंज परिसरात एकटी आलीच कशी? तिच्याकडे भांडे, औषधी आणि कपडे सापडले आहेत याचा अर्थ काय? या महिलेला जाणीवपूर्वीक किंवा काही विशिष्ट कारणासाठी तर नाही ना सोडण्यात आले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.


आईने केला मुलीच्या आत्याचाराचा खुलासा..
- महिलेने शुद्ध आल्यानंतर हेल्पेज इंडिया संस्थेच्या लोकांना सांगितले की, तिचे नाव मखाना देवी आहे. तिचा पती दुर्गा प्रसाद अमीनाबाद येथील हॉटेलमध्ये काम करत होता. आता त्याचा मृत्यू झाला आहे. मोठी मुलगी कुंवारी देवीचे लग्न झाले आहे. ती आपल्या सासरी राहते. तिच्यापेक्षा लहान आणखी दोन मीरा आणि सीता या मुली आहेत. त्यांचेही लग्न झाले आहे. त्या ही सासरी राहतात. तिन्ही मुलींच्या लग्नासाठी घर विकले होते.
- तेव्हापासून मी मोठी मुलगी कुंवारी देवी सोबत राहत होते. परंतु, तीला आता माझं ओझं झाल होता. त्यामुळे तिने मला गोलागंजच्या एका मजारजवळ सोडून निघून गेली. आता मला परत मुलीकडे जायचे नाही. मला येथेच रहायचे आहे.


महिलेकडे सापडेल्या कागदांवरून घरच्यांच्या शोध...
हेल्पेज इंडियाचे प्रमुख डॉ पीपी सिंह यांनी सांगितले की, महिलेकडे सापडलेल्या कागदांच्या आधारावर तिच्या घरच्यांचा शोध घेण्यात येत आहे. 9 डिसेंबरला तिच्या दोन मुलींचा संस्थेमध्ये फोन आला होता, त्या महिलेला आपल्याकडे घेऊन जाण्यात तयार आहेत. सध्या आम्ही तिची तब्बेत ठिक होण्याची वाट पाहत आहोत.

 

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...