आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या जवानाचा निपाहमुळे मृत्यू?; रक्ताचे नमुने चाचणीसाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - केरळात सुटी घालवून कोलकात्यात परतलेल्या भारतीय लष्कराच्या एका जवानाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तो निपाह व्हायरसने ग्रस्त असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवान शिमूप्रसादचा सोमवारी मृत्यू झाला होता, मात्र स्थानिक माध्यमांत बुधवारी लष्करी प्रवक्त्याच्या हवाल्याने निपाहने मृत्यू झाल्याचे वृत्त आले. केरळहून परतल्यानंतर २० एप्रिलला तापामुळे शिमूप्रसाद यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीत पाठवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...