आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या हत्तिणीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खेरी- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील राष्ट्रीय उद्यानात गेल्या तीन दशकाहून अधिक काळ लोकांचे मनोरंजन करणाऱ्या पुष्पाकली या ८६ वर्षीय हत्तिणीचा मृत्यू झाला. दुधवाच्या राष्ट्रीय उद्यानात १९८६ मध्ये हत्तीच्या कळपासोबत ती दाखल झाली होती.

 

पुष्पाकलीचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. दुधवा राष्ट्रीय उद्यानाचे संचालक महावीर कौजलगी यांनी सांगितले, पुष्पाकलीने पर्यटन विभागाने आयोजित केेलेल्या विविध कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ती  थकत चालली होती. पुष्पाकलीने सुरक्षा दलाच्या शोध माेहिमेतही उत्कृष्ट कामगिरी बजावली. येथील राष्ट्रीय उद्यानात ती पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरली होती.

 

उत्तर प्रदेशात वाघांच्या शोध मोहिमेतही तिचा सहभाग होता, असे त्यांनी सांगितले.
पुष्पाकलींने एका पिलाला जन्म दिला होता. तो आता १८ वर्षाचा आहे. हत्तिणीचे पिल्लूही पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. पुष्पाकलीच्या जाण्याने राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...