आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यावर स्वदेशी बनावटीची शस्त्रे लादणार नाही, संरक्षणमंत्री सीतारमण यांची स्पष्टोक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अर्जुन मार्क२’ रणगाड्याचे प्रात्यक्षिक यावेळी झाले. - Divya Marathi
‘अर्जुन मार्क२’ रणगाड्याचे प्रात्यक्षिक यावेळी झाले.

चेन्नई - केंद्र सरकार देशामध्ये शस्त्रास्त्र निर्मिती करण्याकडे गांभीर्याने पाहत आहे. यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, सैन्याच्या तिन्ही दलांवर ही शस्त्रे विकत घेण्याचे बंधन नाही. कोणत्याही संरक्षण सामग्री खरेदीसाठी सैन्यावर दबाव नसेल. भारतीय सैन्य आपल्या गरजेनुरूप शस्त्र खरेदी करण्यासाठी स्वतंत्र आहे.

 

चेन्नईत सुरू होणाऱ्या ४ दिवसीय संरक्षण प्रदर्शनापूर्वी सीतारमण यांनी पत्रपरिषदेत आपली भूमिका मांडली. ‘डेफ एक्स्पो २०१८’ ला आज  सुरुवात झाली.  स्वदेशी बनावटीच्या शस्त्रनिर्मितीसाठी सरकार प्राधान्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये खासगी गुंतवणूक वाढवली जात आहे. याचे भविष्यात चांगले परिणाम होतील, असे सीतारमण म्हणाल्या.  
चेन्नईपासून ५० किलोमीटरवर असलेल्या बंगालच्या खाडीजवळ ऐतिहासिक चोलामंडल व महाबलीपुरमच्या जवळ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशी बनावटीची शस्त्रे सैन्याने जरूर खरेदी करावीत. मात्र, त्यासाठी दबाव असता कामा नये, असे संरक्षणमंत्री म्हणाल्या. सैन्याच्या गरजा केवळ सैन्यच ठरवू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांची वाखाणणी सीतारमण यांनी केली. 

 

डेफ एक्स्पोचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि उपवासही  
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनाचे आज उद््घाटन करण्यात येईल. डेफ एक्स्पो-२०१८ च्या सुरुवातीच्या दिवशी पंतप्रधान व संरक्षणमंत्री उपवास करणार आहेत. उद्घाटनाच्या पूर्वी बुधवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत सीतारमण यांनी ही माहिती दिली. विधिवत उद्घाटनानंतर मोदींसोबत भाजप खासदारही उपवास करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार विरोधी पक्षांच्या आंदोलनांचा निषेध करण्यासाठी उपवास करत आहेत. बजेट सत्रादरम्यान संसदेचे कामकाज ठप्प राहिले. विरोधकांच्या अतिरेकामुळे असे झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्याचा निषेध उपवासाद्वारे नोंदवला जाईल. २२ दिवस सलग कामकाज ठप्प होते.

बातम्या आणखी आहेत...