आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi DCP Donates Salary To Family Of Kin Of Murdered Truck Driver On Pak Border

PAK सीमेवरील कुटुंबासाठी देवदूत बनल्या दिल्लीच्या DCP; अशा माणुसकीला सलाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस (DCP) असलम खान पाकिस्तान सीमेलगत राहणाऱ्या एका कुटुंबासाठी देवदूत बनल्या आहेत. त्यांचा या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. तरीही त्या गेल्या 6 महिन्यांपासून आपल्या वेतनाचा एक भाग या कुटुंबाला पाठवत आहेत. या कुटुंबातील प्रमुख सरदार मानसिंग यांचा मृत्यू झाला. असलम यांनी कुटुंबाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हापासून त्या यांना मदत करत आहेत. डीसीपी आणि या सामान्य कुटुंबातील नात्याचे सगळीकडून कौतुक होत आहे.


एका घटनेने बदलले आयुष्य
याची सुरुवात जहागीरपुरीमध्ये 9 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेने झाली होती. चंदीगड येथून ट्रक घेऊन जाणारे चालक सरदार मानसिंग रस्ता भटकले होते. रात्रीचे 2 वाजले होते. त्यांनी काही लोकांना पाहून रस्ता विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते लोक प्रत्यक्षात दरोडेखोर निघाले. मानसिंग यांनी विरोध केला तेव्हा त्या दरोडेखोरांनी त्यांना चाकूने भोसकले. मानसिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप वाइट होती. त्यात घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूने हे कुटुंब रस्त्यावर आले होते. 


घरी कळाले तेव्हा...
मानसिंग यांचे कुटुंब जम्मू-काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये सुचेतगड आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या फ्लोरा गावात राहतात. मानसिंग यांच्या घरात दोन मुली बलजीत कौर (18) आणि जसमीर कौर (14) आणि एक मुलगा असमीत सिंग (9) आणि पत्नी असा परिवार आहे. या कुटुंबाकडे शेत जमीन आहे. परंतु, ती जमीन भारत आणि पाकिस्तानच्या भांडणात सापडली आहे. त्यामुळे, शेती करणे अशक्य होते. अशात वडिलांनी ट्रक ड्रायव्हिंग करून घर चालवण्यास सुरुवात केली. गेल्या 5 महिन्यांपासून ते घराबाहेर होते आणि आपल्यासोबत 80 हजार रुपये कमावून येणार होते. त्या रकमेने घराची परिस्थिती सुधरेल अशी अपेक्षा कुटुंबियांना होती. परंतु, घरी एकमेव कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूचेच वृत्त आले. 


कुटुंबाला पाहिले सुद्धा नाही, तरीही मदत
असलम यांना मानसिंग यांचा मृत्यू आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती याबद्दल कळाले. तेव्हापासूनच त्यांनी आपल्या पगाराचा एक ठराविक भाग दरमहा त्या कुटुंबाला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीची व्यवस्था केली. विशेष म्हणजे, त्यांनी या कुटुंबियांना प्रत्यक्षात एकदाही पाहिलेले नाही. 


दर 3 दिवसाला फोनवर विचारपूस
मान सिंग यांची मुलगी बलजीतने सांगितल्याप्रमाणे, डीसीपी आमच्याशी दर 3 दिवसाला एकदा संवाद साधतात आणि कुटुंबियांची विचारणा करतात. या कुटुंबियांना कधीच काही कमी होऊ नये याची ती काळजी घेत राहतात. डीसीपी असलम आता बलजीतच्या रोल मॉडेल झाल्या आहेत. आपणही मोठे होऊ चांगले शिकून आयपीएस होऊ असे स्वप्न ती पाहत आहे. एकेदिवशी आपणही दिल्ली पोलिसांत काम करू अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...