आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राविरोधात जनतेत असंतोष उसळेल: एन. चंद्राबाबू नायडू यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती (आंध्र प्रदेश)- राज्यकर्त्यांकडून आपली फसवणूक झाल्याची भावना जनतेत बळावल्यास लोकक्षोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिला. हा इशारा केंद्रातील भाजप सरकारला असल्याचा रोख त्यांच्या भाषणात होता. आंध्र प्रदेशवर केंद्रीय अर्थसंकल्पात अन्याय केल्याची जनतेची भावना आहे.  पक्षाच्या अधिकृत बैठकीत चंद्राबाबूंनी प्रथमच आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आंध्र प्रदेश राज्याच्या पुनर्रचनेत २०१४ मध्ये झालेल्या कायद्यान्वये केंद्राने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यानुसार राज्याला जो निधी मिळावयास हवा होता तो दिला नाही. लोकांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.  जनता उठाव करू शकते, असे नायडू म्हणाले. काँग्रेसने राज्याची फाळणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली.  २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष जनतेने धुळीस मिळवला. काही खासदारांना अनामत रक्कम वाचवता आली नाही, असे त्यांनी सांगितले.   


दरम्यान, येत्या ५ मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. ८ मार्च रोजी राज्याच्या दोन्ही सभागृहांत अर्थसंकल्प मांडण्यात येईल. राज्याचा विकास दर गेल्या तीन वर्षांत ११-१२ % होता. आगामी काळात तो १५ % होईल. राज्यातील अनेक विभागांची पुनर्रचना करण्याचे संकेत त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...