आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - विश्व हिंदू परिषद समर्थित रामराज्य रथयात्रा मंगळवारी सकाळी तामिळनाडूत पोहोचताच विधानसभेत गदारोळ झाला व मुख्य विरोधी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) व त्याच्या सहकारी पक्ष्यांच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
निलंबनानंतर द्रमुक सदस्यांनी कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली राज्य सचिवालयासमोर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राज्य सरकार केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निर्देशावर काम करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
स्टॅलिन यांनी विधानसभेत शून्य प्रहरादरम्यान या मुद्द्यावर लक्षवेधी प्रस्ताव सादर केला. धार्मिक सौहार्द बिघडेल, अशी भीती व्यक्त करत त्यांनी रथयात्रेस परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी केली. राज्य अण्णा द्रमुक सरकार चालवते आहे की भाजप, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनी त्यास उत्तर देत सांगितले की, काही पक्ष रथयात्रेस राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून ते राजकीय फायदा उचलू इच्छितात. रथयात्रा पाच राज्यांतून शांततापूर्ण पद्धतीने जात आहे. सकाळी केरळच्या तिरुनेलवेलीमध्ये पोहोचली. तिथून ती मदुराई, रामनाथपुरम, तुतिकोरीन व कन्याकुमारीला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.