आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6.3 फुटाच्या पतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला, आता मृताच्या भावाने केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- एका महिलेने गोळी घालून आपल्या पतीची हत्या केली आणि मृतदेह एक बॅगमध्ये भरून बीएमडब्लयू कार ठेवला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावणार त्याआधी पोलिसांना याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात मृत एकमच्याभावाने ASP ला एक अर्ज केला आहे. यात त्याने एकमच्या घराची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली आहे. यातून अणखी काही पुरावे हाती लागतील असे त्याने म्हटले आहे.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण....
- मृताचे नाव एकम ढिल्लो होते, तर त्याच्या पत्नीचे नाव सीरत कौर आहे. सीरत कौर काँग्रेसचे माजी आमदार इंद्र सिंह मोफर यांची भाची आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, पतीची गोळी घालून हत्या केल्यानंतर सीरते मृतदेह एक सुटकेसमध्ये बंध केला आणि एका महिलेच्या मदतीने तो घराबाहेर पार्किंमधे आणला होता.
- दोघीही सुटकेस बीएमडब्लयू कारच्या मागच्या सीटवर ठेवण्यचा प्रयत्न करत होत्या. सुटकेस जड असल्याने ती दोघींना मिळून देखील उचलून गाडीत ठेवताना अडचन येत होती.
- सुटकेस गाडीत ठेवण्यासाठी सीरतने तेथून जाणाऱ्या एका ऑटोला आवाज देऊन थांबवले आणि ऑटो चालकाला कपडे जास्त असल्यामुळे बॅग जड झाली असल्याचे सांगितले आणि मदत करण्याची विनंती केली. ऑटो चालकाने बॅग गाडीत ठेवण्यासाठी मदत केली.


कुटुंबाने केली व्हिडिओग्राफीची मागणी...
- एकम मर्डर केसमध्ये कुटुंबीयांनी एसएसपी कुलदीप सिंह चहल यांच्याकडे एक अर्ज केला आहे. यात त्यांनी घटनास्थळी अनेक महत्वाचे पुरावे असल्याचे सांगत त्यांच्याशी कोणी छेडछाड करू नये म्हणून घटनास्थळाची व्हिडिओ शुटिंग कऱण्याची मागणी केली आहे. 
- कोन्हीही घटनास्थळावरील पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शुटिंग करावी अशी विनंती मृत व्यक्तीचा भाऊ दर्शन ढिल्लो याने केली आहे.

 

ऑटो चालकानेच दिली होती पोलिसांना माहिती...
- ऑटो चालक बॅग गाडीत ठेऊन ऑटोत परतला तेव्हा त्याला आपल्या हातावर रक्त लागलेले असल्याचे दिसले.
- ऑटो चालकाने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. तोपर्यंत आरोपी महिला तेथून फरार झाली होती.
- पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून आरोपी महिलेचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम गठीत केल्या होत्या.
- पोलिसांनी मृत एकमच्या छोट्या भाऊ दर्शन सिंहच्या तक्रारीवरून सीरत कौर, मृत एकमची सासू जसविंदर कौर आणि साला विनय याच्याविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला होता.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...