आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी-मौर्य यांच्या रिक्त लोकसभा जागेवर 11 मार्च रोजी पोटनिवडणूक, 14 ला निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुक आयोगाने यूपी आणि बिहार मधील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली. - Divya Marathi
निवडणुक आयोगाने यूपी आणि बिहार मधील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली.

लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर 11 मार्च रोजी पोटनिवडणुक होणार आहे. निवडणूक आयोगाने (EC) शुक्रवारी उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहारमधील एका लोकसभा मतदारसंघासाठीच्या पोट निवडणुकीची घोषणा केली. याशिवाय बिहारच्या दोन विधानसभासांठीही निवडणूक होणार आहे. या पाच जागांसाठी 11 मार्च रोजी मतदान होईल. 14 मार्चला मतमोजणी होणार आहे. लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 2 जागांसाठी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी आहे. 

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, नामांकन अर्जांची छाननी 21 फेब्रुवारी रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 23 फेब्रुवारीपर्यंत राहाणार आहे. 

 

कुठे होणार निवडणूक 
उत्तर प्रदेश - 1) गोरखपूर आणि फुलपूर  लोकसभा मतदारसंघ. 

 

गोरखपूर :
- गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा लोकसभा मतदारसंघ होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 21 सप्टेंबर 2017 ला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. योगी 1998 पासून येथून भाजपच्या तिकीटावर विजयी होत आले आहेत. 1998, 1999, 2004, 2009, 2014 मध्ये ते गोरखपूरमधून लोकसभेत गेले आहेत. 

 

फुलपुर : 
- उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे 2014 मध्ये फुलपुर येथून लोकसभेववर निवडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर प्रथमच येथे कमळ फुलले होते. फुलपुर हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा मतदारसंघ राहिेला आहे. 1952 ते 1962 पर्यंत ते फुलपुरचे खासदार होते. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंह देखील याच मतदारसंघातून विजयी झाले होते.


बिहार 

 

1) अररिया: 
- 2014च्या लोकसभा निवडणुकीत येथून राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) मोहम्मद तस्लीमुद्दीन विजयी झाले होते. 17 सप्टेंबर 2017 रोजी तस्लीमुद्दीन यांचे निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. 

2) भभुआ : 
- विधानसभेच्या या जागेवरील भाजप आमदार आनंद भुषण पांडे यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 

3) जहानाबाद: 
- जहानाबाद विधानसभा मतदारसंघ आरजेडीकडे होता. येथून मुंद्रीका सिंह यादव आमदार होत्या.
 

बातम्या आणखी आहेत...