आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Exemplary Punishment To Major Leetul Gogoi If Found Guilty: Army Chief Gen Rawat

मेजर गोगोई चुकीचे असतील तर सर्वांना धडा मिळेल अशी शिक्षा देऊ - आर्मी चीफ रावत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्मी चीफ रावत यांनी शुक्रवारी काश्मीर खोऱ्याचा दौरा केला. (फाइल) - Divya Marathi
आर्मी चीफ रावत यांनी शुक्रवारी काश्मीर खोऱ्याचा दौरा केला. (फाइल)

श्रीनगर - हॉटेलमध्ये मुलीसोबत सापडलेले मेजर लीतूल गोगोईने जर काही चुकीचे काम केले असेल तर त्यांना अशी शिक्षा दिली जाईल, की तो सर्वांनाच धडा असेल, अशा शब्दात आर्मी चीफ बिपीन रावत यांनी विश्वास दिला आहे. बुधवारी मेजर गोगोई एका हॉटेलमध्ये मुलीसोबत सापडले होते. यावेळी स्टाफसोबतही   त्यांची धरपकड झाली होती. जम्मू-काश्मीर पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणी मीडियाने आर्मी चीफ रावत यांना प्रश्न केला होता. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर आर्मी चीफ खोऱ्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आले होते. 

 

- आर्मी चीफ रावत म्हणाले, 'लष्करातील कितीही मोठा अधिकारी असला आणि त्याने चुकीचे काम केले असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जर मेजर गोगईने काही चुकीचे केलेले तपासात आढळले, तर मी तुम्हाला विश्वास देतो की त्यांना अशी शिक्षा केली जाईल की ते पुढील काळात उदाहरण ठरले.'
- मेजर गोगोई यांना बुधवारी रात्री जम्मू-काश्मीर पोलिसांनी येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. हॉटेलमध्ये आलेली एक मुलगी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या नावाने बुक केलेल्या रुममध्ये जात होती. त्यावेळी हॉटेल स्टाफसोबत त्यांची धरपकड झाली. तिथे पोहोचलेल्या पोलिसांनी मेजर गोगोई यांचा जबाब नोंदवून त्यांना आर्मी यूनिटच्या ताब्यात दिले होते. 

 

काश्मीरी युवकाला गाडीसमोर बांधणारे वादग्रस्त मेजर आहे गोगोई 
- गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दगडफेक सुरु असलेल्या भागात मेजर गोगोईने फारुख अहमद डार या युवकाला आर्मीच्या जीपसमोर ढाल म्हणून बांधले होते. युवकाला जीपस समोर बांधून त्यांनी आर्मी युनिट सुरक्षित नेले होते. या घटनेने मेजर गोगोईंवर देशभरातून टीक झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...