आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापणजी- गोव्यात भाजपने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने बुधवारी केला.
गोव्याचे आपचे समन्वयक एल्विस गोम्स यांनी हा आरोप केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दबावाखाली येत आयोगाने ही कारवाई केल्याचा दावा गोम्स यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांनी उपस्थित जनसमुदायाला भाजप तसेच काँग्रेसच्या उमेदवाराकडून लाच घ्यावी. परंतु मतदान मात्र आम आदमी पार्टीला करावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर आयोगाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी हाेणार आहे.
‘जानेवारीपर्यंत एफआयआरच नाही’ : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयासमोर निवडणूक आयोगाकडून एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु आम्ही माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाद्वारे कोणताही एफआयआर दाखल नसल्याचे स्पष्ट झाले. किमान जानेवारीपर्यंत तरी एफआयआर दाखल झालेला नव्हता, असा दावा गोम्स यांनी केला. दिल्ली उच्च न्यायालयात २ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सुनावणी सुरू होती. त्याचवेळी गोवा सरकारने निवडणूक आयोगावर त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी दबाव वाढवण्यास सुरुवात होती, असा दावा गोम्स यांनी केला.
२६ फेब्रुवारीला पडताळणीवर सुनावणी
केजरीवाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. या प्रकरणी २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यात त्याबद्दलची पडताळणी होणार आहे, असे गोम्स यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.