आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणशी चाबहारसह 15 करार शक्य; रुहानी यांच्यासमवेत पाच मंत्रीही भेटीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी गुरुवारी भारताच्या तीनदिवसीय दौऱ्यावर हैदराबादेत पोहोचले. ऑगस्ट २०१३ मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर रुहानी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. वास्तविक त्यापूर्वी रुहानी यांनी अनेकवेळा भारताचे दौरे केले आहेत.

 
यंदाच्या दौऱ्यात ते नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत परस्पर हितसंबंध, क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. त्यात उभय नेत्यांत चाबहार बंदरास लवकरात लवकर अंतिम रुप देण्यावरही चर्चा अपेक्षित आहे. रुहानी शनिवारी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये एक विशेष व्याख्यात देतील. त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. इराण हा भारताचा प्रमुख तेल पुरवठादार देश आहे. भारताला दरवर्षी सुमारे ८३ हजार कोटी रुपयांचा आयात केली जाते. त्यात ६७ हजार कोटींचे कच्चे तेल तसेच त्याच्याशी संबंधित वस्तूही भारत आयात करतो. २१ सदस्यीय शिष्टमंडळासह रुहानी यांचा दोन दिवस हैदराबादेत मुक्काम राहील.

रुहानी यांच्यासमवेत पाच मंत्रीही भेटीवर

पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून भारत दौऱ्यावर आलेल्या रुहानी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांच्यासोबत शिष्टमंडळदेखील आले आहे. त्यात पाच मंत्री आहेत.  मोहंमद जावेद जरीफ, उपराष्ट्राध्यक्ष मोहंमद नहवांदियां, तेलमंत्री बिजान जांगनेह, रस्ते व शहरी विकास मंत्री अखौंदी, उद्योग तथा उत्खनन मंत्री शरियामादरी व रुहानी यांचे चीफ ऑफ स्टाफ मेहमूद वैजी यांच्यासह इराणमधील आघाडीच्या उद्योजकांचा शिष्टमंडळात समावेश आहे

 

३२०० कोटींच्या खर्चातून  चाबहार बंदराची निर्मिती 

चाबहार बंदर भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ३२०० कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या चाबहार बंदरामुळे पाकिस्तानच्या सीमेला सोडून भारत अफगाणिस्तानहून इराणच्या बंदरापर्यंत मालाची देवाण-घेवाण करू शकतो. रुहानी शनिवारी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये व्याख्यान देतील. २१ सदस्यी शिष्टमंडळासह त्यांचा हैदराबादेत मुक्काम आहे. हैदराबादममधील इराणी नागरिकांशीदेखील ते चर्चा करतील. त्याचबरोबर ऐतिहासिक मक्का मशिदीमध्ये नमाज अदा करतील. 

 

व्हिसा, समुपदेशन सुविधेसह  अन्य क्षेत्रांतही उभय देशांत चर्चा  
- उभय देशांत पंधरा करारांवर स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे. त्यात व्हिसा जारी करण्याची सुविधा, समुपदेशन सहकार्याचा समावेश.  
- इराणची तेल कंपनी फरजाद-बी गॅस फील्ड या दौऱ्यात महत्त्वाचा करार करू शकते. कंपनीची २००७ मध्ये स्थापना झाली होती.   
- इराण, भारतासोबत एक चांगला करार करून पुढील वाटचाल करू लागला आहे. कारण २०१५ मध्ये अमेरिकेसह चीन आणि अन्य ६ देशांनी निर्बंध लादले होते. संकट काळात भारतच उत्पन्नाचा स्रोत होता.  

बातम्या आणखी आहेत...