आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजीही बोलू शकल्या नाही थायलंडच्या Call Girls; अटकेनंतर इशाऱ्यांमध्येच संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - येथील गांधी नगरच्या एका ब्युटी पार्लर-स्पा सेंटरमधून स्थानिक तरुणींसह परदेशी कॉलगर्ल्स सुद्धा पकडण्यात आल्या आहेत. त्यापैकीच दोघी थायलंडच्या आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांना हिंदी किंवा इंग्रजी सुद्धा कळत नाही. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची त्या फक्त हातवारे करून उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे, पकडल्या गेलेल्या इतर तरुणींच्या जबाबावरच पोलिसांना तपास करावा लागत आहे. या प्रकरणी 5 ग्राहकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. तसेच स्पा सेंटरचा संचालक सध्या फरार आहे. हे कथित ब्युटी पार्लर आणि स्पा जानेवारीतच सुरू झाले होते. 


नको त्या अवस्थेत सापडल्या...
- निशातपुरा येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी लोकेश यांनी सांगितल्याप्रमाणे, क्वीन व्हिला गोंदरमऊ गांधी नगर येथील ब्युटी पार्लर स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी डमी कस्टमर पाठवून तपास केला. 
- पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सगळेच कस्टमर आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्या. सगळ्या खोल्यांमध्ये अशीच अवस्था होती. वेग-वेगळ्या खोल्यांमधून 5 पुरुष आणि 2 परदेशी कॉलगर्ल्ससह एकूणच 8 कॉलगर्ल पकडण्यात आल्या आहेत. 
- या सर्वांकडून 15 मोबाइल फोन, 69 हजार रुपये रोख इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे. सेंटरचा संचालक राज पाटीदार सध्या फरार आहे. तसेच पोलिसांनी अटक केलेले सर्व 5 ग्राहक गांधीनगरचे स्थानिक आहेत. 


2 ते 10 हजारांपर्यंत चार्ज
- आरोपींनी सांगितल्याप्रमाणे, स्पा सेंटरमध्ये सर्विस 2 हजार रुपयांपासून सुरू होती. विविध प्रकारे एका ग्राहकाकडून 10 हजार रुपयांपर्यंत वसूल केले जात होते. 
- थायलंड येथून असलेल्या दोन्ही तरुणी पहिल्यांदाच भोपाळला आल्या होत्या. कमाईसाठी 18 मे रोजी भारतात दाखल झाल्यानंतर त्या 19 मे रोजी भोपाळला पोहोचल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...