आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या तंगधारमध्ये घुसखोरीचा प्रयत्न निष्फळ, पाच दहशतवाद्यांना कंठस्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. (फाइल) - Divya Marathi
शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. (फाइल)

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या तंगधार येथे झालेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. रमजानच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन थांबवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर सातत्याने घुसघोरीचा प्रयत्न होत होता. भारतीय लष्कराने गेल्या 7 महिन्यांमध्ये 75   पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले आहे. 

 

शांतता हवी असेल तर पाकिस्तानने घुसखोरी रोखावी - रावत 
- रमजान सुरु झाल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील अभियान भारतीय जवानांनी थांबवल्यानंतर आर्मी चीफ बिपीन रावत यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले रावत शुक्रवारी म्हणाले, पाकिस्तानला शांतता हवी असेल तर त्यांनी दहशतवाद्यांची घुसखोरी बंद करावी. ते म्हणाले, नापाक हरकतींना तोडीस तोड उत्तर द्यावे लागेल आणि आम्ही तसे उत्तर देणार. 

 

शुक्रवारी लष्कराच्या छावणीवर हल्ला 
- जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे शुक्रवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या छावणीवर हँडग्रेनेड फेकले. 34 राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात नाकेबंदी करण्यात आली. 
- गुरुवारी जम्मूच्या एका बस स्टॉप आणि श्रीनगरच्या बरारीपोरा येथे लष्कर छावणीवर हँडग्रेनेड फेकला होता. या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले होते. 
- दुसरीकडे अनंतनाग जिल्ह्यातील वानपोह पॉवर ग्रेड स्टेशनवरील पोलिस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. येथे तैनात पोलिस जवानाची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न झाला. पोलिस चौकीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. त्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. 

 

रमजानमध्ये सुरक्षा रक्षकांनी बंद केले ऑपरेशन 
- केंद्र सरकारने राज्य शासनाच्या शिफारसीवर रमजान दरम्यान सर्च ऑपरेशन थांबवण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले होते, 'शांतता प्रिय मुस्लिमांना शांततेचे वातावरण देण्यासाठी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.' त्यासोबतच हेही स्पष्ट केले होते की दहशतवादी हल्ला झाल्यानंतर निरपराध लोकांना वाचवण्यासाठी प्रत्युत्तरादाखल कारवाई करता येईल. 

बातम्या आणखी आहेत...