आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही रेल्वेतून 282 अधिकाऱ्यांचा फुकट प्रवास, एक कोटी रु. बुडाले; बाबूगिरीचा पर्दाफाश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- परदेशी पाहुण्यांना राजेशाही थाटात मिरवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रॉयल रेल्वेतून अधिकारी निमंत्रितांसाठीच्या पासचा वापर करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. गेल्या ६ वर्षांत रेल्वेच्या २८२ अधिकाऱ्यांनी राजस्थान पर्यटन विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या पॅलेस अॉन व्हील्स आणि रॉयल राजस्थान ऑन व्हील्समधून एक कोटी ४३ हजार ८२३ रुपयांचा मोफत प्रवास केला आहे.  ४ जानेवारी रोजी लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या ‘टुरिझम प्रमोशन अॅड पिलग्रिमेज सर्किट’च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.  


समितीने या रेल्वेत देण्यात येणाऱ्या निमंत्रितांसाठीच्या प्रवासाची सुविधा बंद करण्याची शिफारस केली आहे. जर या राजेशाही रेल्वेतून आपला खर्चही निघत नसेल तर अशा निमंत्रितांसाठीच्या मोफत प्रवासाची सुविधा या रेल्वेतून देण्याची काय गरज आहे? करदात्यांच्या पैशाचा काही लोकांना या आलिशान रेल्वेतून प्रवासाच्या नावाखाली  लाभ देण्याचा रेल्वेला कोणताही अधिकार नाही, असे ताशेरे समितीने ओढले आहेत.  

 

५ वर्षांत दोन्ही रेल्वेंची ५५%आसने रिकामी  
शाही रेल्वेतून गेल्या ६ वर्षांत २८२ अधिकाऱ्यांनी १ कोटीहून अधिक निमंत्रितांसाठीच्या प्रवासाचा फायदा घेतला.  पॅलेस ऑन व्हील्समध्ये २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान ५४.१९ % आसने भरली.  ४५.०६% आसने रिकामी राहिली. रॉयल राजस्थान ऑन व्हील्समध्ये या काळात ५७.७६% आसने रिकामी होती, तर ४२.९१ आसनावर प्रवासी होते.

 

 

> मला अशा प्रकारच्या अहवालाची अशी काही माहिती मिळालेली नाही. माहिती घेऊन मग सांगतो.  
-प्रदीप बोरड, एमडी, आरटीडीसी 

 

फायद्या-तोट्याचा हिशेब नाही, शाही रेल्वेच्या कमाईत घट  

समितीने म्हटले, रेल्वे विभागाने या रेल्वेंवर खर्च होणाऱ्या रकमेचा तपशील ठेवलेला नाही, त्यावरून रेल्वे विभाग या राजेशाही रेल्वेच्या फायद्या-तोट्याचा हिशेब कसा ठेवत असेल, हे समजत नाही. पॅलेस ऑन व्हील्स आणि रॉयल राजस्थान ऑन व्हील्सचे उत्पन्न कमी होत आहे. २०१२-१३  मध्ये पॅलेस ऑन व्हील्सने ३५.३३ कोटी रुपये कमावले, २०१३-१४ मध्ये ३८.३३, २०१४-१५ मध्ये ३५.७१, २०१५.१६ मध्ये ३३.४७ आणि २०१६-१७ मध्ये फक्त २७.११ कोटी रुपये कमावले. म्हणजे गेल्या ५ वर्षांत १७०.४५ कोटी रुपयांची कमाई झाली. पण यातील ९५.४४ कोटी रुपये रेल्वेचा िहस्सा होता. 


अशा प्रकारे राजस्थान ऑन व्हील्सने २०१२-१३ मध्ये १७.७७ कोटी २०१३-१४ मध्ये १४.०७ कोटी रुपये, २०१४-१५ मध्ये १६.१९ कोटी आणि २०१६-१७ मध्ये ५.९६ कोटी रुपये कमाई केली. एकूण कमाई ६४.५५ कोटी रुपये इतकी होती. यात हॉलिडेज चार्जेस ४२.४७ कोटी म्हणजे ६५.७९% इतका होता.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, दरवर्षी अधिकाऱ्यांनी कसा घेतला मोफत प्रवाससेवेचा लाभ... 

बातम्या आणखी आहेत...