आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान विधानसभेत भूत, दोष शोधण्यासाठी बोलावला मांत्रिक, 3-4 तास केली पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- अामदारांनी विधानसभेत भूत असल्याच्या चर्चेचे पिल्लू सोडले. याच अंधश्रद्धेची आता हद्द झाली. विधानसभेत मांत्रिक बोलावण्यात आला. वास्तुशास्त्राचे जाणकार आणि मांत्रिक गणेश महाराजांनी विधानसभेतील वास्तू व इतर दोषांची पाहणी केली. कालुलाल गुर्जर यांनी सांगितले, गणेश महाराज यांची विधानसभा परिसरात भेट झाली. त्यांच्याशी भूत-प्रेतावरून चर्चाही झाली. गणेश महाराजांनी काय पाहिले, काय केले याची कल्पना नाही. 


मांत्रिकांचा दावा : जमिनीत दोष, सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही
मांत्रिक गणेश महाराज यांचा दावा असा की, विधानसभेची जमीन जीवहंता (बळी घेणारी) आहे. या वास्तूत भयंकर दोष आहे. दोष काढला जात नाही तोपर्यंत येथे आलेले सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही. मी विद्येने विधानसभेचे आकलन केले. सकारात्मक ऊर्जेची पातळी १०% आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा कोपरा योग्य नाही. यात ऊर्जेची पातळी ४० टक्के आहे, असे  गणेश महाराज यांनी सांगितले.  


आर्किटेक्ट म्हणाले, १२०० तज्ज्ञ होते, वास्तुदोष नाही
या भवनाचे डिझाइन तयार करणारे निवृत्त माजी प्रमुख आर्किटेक्ट विजय माथूर म्हणाले, विधानसभेचा नकाशा १२०० तज्ज्ञांच्या मदतीने डिझाइन करण्यात आला. याची नोंद विधानसभेत आहे. नकाशा तयार करण्यापूर्वी वास्तुदोषासह अनेक फॉर्म्युले वापरले गेले. येथे कोणताही वास्तुदोष नाही.  


मांत्रिकाची ओळख  
वैशालीनगरचे पंडित गणेश अनेक वर्षांपासून गुजरातेत वास्तुशास्त्राचे जाणकार आहेत. मंत्रविधी करतात. गेल्या भाजप सरकारच्या काळात त्यांना येथे बोलावण्यात आले होते. प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची प्रतिमा बसवण्याचा सल्ला दिला होता. परंतु नियमातील अटीमुळे प्रतिमा बसवता आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...