आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहमीरपूर- येथे एका अल्पवयीन तरूणीवर सामुहिक बलात्कार करून निर्दयीपणे जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. सर्व आरोपी गावातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
घननेनंतर गावात एकच गोधळ उडाला आहे. नातेवाइकांनुसार, यातील दोन आरोपी गावातीलच असून ते दोघे सख्खे भाऊ आहेत. लोकांना या घटनेची माहिती मिळू नये म्हणून आरोपींनी तिच्यावर रॉकेल टाकून पेटून दिले. या दरम्यान पीडित तरूणीचा भाऊ घरी पोहोचला आणि त्याने आरोपींना ओळखले. यानंतर आरोपींनी त्याला देखील मारण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या भावाने सांगितले की, दोन्ही आरोपींनी दरवाजा बंद करून आग लावली.
नातेवाईकांनी केले आरोप...
नातेवाईकांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा पीडित तरूणी घरात एकटी होती. आई वडील बाहेरगावी गेले होते, तर छोटा भाऊ गावातच होता. घरात तरूणीला एकटी पाहून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तरूणीचा विवाह याच वर्षी एप्रीलमध्ये होणार होता. यासाठी घरच्यांनी दागिने देखील बनवले होते आणि काही रोख रक्कम देखील घरी ठेवलेली होती. हे रोख पैसे आणि दागिने देखील आरोपींनी लंपास केले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पोलिस काय म्हणतात...
घनटेची माहिती मिळताच पोलिस रात्रीच पोलिस घटनास्थळी पोहोचले. आपर पोलिस अधिक्षक, लाल साहब यादव यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टवरून सत्याचा खुलासा होईल.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.