आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभा म्हणाली, रोहितपासून माझ्या जीवितास धोका; पोलिसांनी आरोपीची काढली धिंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - बॉलीवूडमध्ये स्वत:ला कास्टिंग डायरेक्टर म्हणवणाऱ्या रोहितसिंग या  माथेफिरू प्रियकराने बीएसएनएलचे सेवानिवृत्त सहायक सरव्यवस्थापक एम. पी. श्रीवास्तव यांच्या घरात घुसून त्यांची मुलगी व नवतारका विभाला खोलीत १२ तास ओलीस ठेवले होते. त्याला नाट्यमयरित्या भोपाळ पोलिसांनी अटक केली.


या रोहित सिंगची शनिवारी मिसरोद पोलिसांनी ठाण्यापासून फार्च्यून डिव्हाइन सिटीपर्यंत धिंड काढली. कॅम्पसमध्ये संतप्त महिलांनी चपलांनी मारहाण केली. आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.   
दरम्यान, नवतारका विभाने म्हटले, रोहितशी माझी मैत्री होती. पण त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे त्याच्याशी संबंध तोडले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता माझे वडील नेहमीप्रमाणे कुलूप लावून बाहेर गेले होते. कारण आम्ही उशीरा उठत असतो. रोहित माझ्या खोलीत आला. मला म्हणाला, तुझी मम्मी झोपलेली आहे. पापा खाली गेले आहेत. ओरडू नकोस. तू माझ्याशी वाईट वागलीस. तुझ्यामुळे माझे आयुष्य उद्धवस्त झाले. मी तुरुंगात गेलो. माझी नोकरी गेली. मला तुझ्याशी दोन मिनिटे बाेलायचे आहे, असे सांगत त्याने दरवाजा आतून लावून घेतला होता.
राेहितने कात्रीने माझ्या मानेवर व पायावर वार केले होते. तू जर माझी झाली नाहीस तर मी जगात तुला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले. मी लग्नास तयार झाले नसते तर कदाचित जिवंत राहिले नसते.  


रोहितसिंग उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास अाहे. विभाच्या खोलीत बसून तो पोलिसांशी वाटाघाटी करत होता.

 

रोहित म्हणाला, विभानेच मला बोलावले होते
अारोपी रोहितसिंग म्हणाला, विभाचे माझ्यावर प्रेम आहे. तिने माझ्याशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ व संदेश मोबाइलमध्ये सुरक्षित आहेत. तिनेच मला गुरुवारी रात्री घरी बोलावले होते. दरवाजा उघडून आत घेतले. सकाळी विभाच्या आईने मला पाहिले अन‌‌्् त्या किंचाळल्या. म्हणून घाबरून मी तिच्या खोलीत बंद करून घेतले. विभाने जर मला फासावर जाण्यासाठी सांगितले तर मी फासावरही जायला तयार आहे, असेही त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...