आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्ड कॉलवरून झाले प्रेम, समोर आलेला प्रियकर निघाला वडिलांच्या वयाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेशनवर बसलेली तरूणी आणि आरोपी - Divya Marathi
स्टेशनवर बसलेली तरूणी आणि आरोपी

भागलपूर- मिस कॉलचे उत्तर देण्याच्या नादात एक महाविद्यालयीन तरूणी आपल्या पेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. प्रियकर समोर आला तेव्हा तो आपल्या वडिलांच्या वयाचा आसल्याचा पाहून तिला धक्काच बसला. त्याला पाहून तरूणीने लग्नास नकार दिला. यानंतर प्रियकराने तरूणीचे अपहरण कऱण्याचा प्रयत्न केला. परंतु, भागलपूर स्टेशनजवळ शुक्रवारी जीआरपीने तरूणीला वाचवले आणि दिलफेक प्रियकराला एसएसपी मनोज कुमार याच्या ताब्यात दिले.


42 वर्षाच्या आहे तरूणीचा प्रियकर...
- ताब्यात घेण्यात आलेल्या प्रियकराचे नाव संदीप कुमार आहे. त्याचे वय जवळपास 42 वर्ष आहे. एसएसपी ने गुन्हा दाखल करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
- तरूणीने सांगितले की, 1 डिसेंबरला रात्री अनेक वेळा एका नंबरवरून मिस कॉल आला. उत्तर देताना एका व्यक्तीने स्वत:ला अनोळखी असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवले.

 

फोनवरच झाले प्रेम, प्रियकराचा चेहरा न पाहताच लग्नास दिला होकार...
फोनवर गप्पा मारातानाच तरूणी कथित व्यक्तीच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये सात दिवस फोनवर गप्पा झाल्या. या दरम्यान कथित व्यक्तीने फोनवर लग्नाचा प्रस्थाव ठेवला. सुरूवातीला तरूणीने नकार दिला. चेहरा पाहिल्याशिवाय लग्न करणार नाही असे तिने सांगितले. यावर खोट बोलत त्याने आपले वय 20 असून दिसायला देखील ठिक ठाक आहे असे सांगितले. लग्नास होकार नाही दिला तर विष प्राशन करून आत्महत्या करेल असे म्हणत त्याने तरूणीला इमोशनल ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्याच्या या बोलण्यात येऊन तरूणीने लग्नास होकार दिला. त्यानंतर त्याने मी भेटण्यास येत असल्याचे तरूणीला सांगितले.

 

ट्यूशन के बहाने प्रेमी से मिलने स्टेशन पहुंची लड़की
शुक्रवारी सकाळी तरूणी घरातून ट्यूशनच्या बहाण्याने निघाली. प्रियकराला भेटण्यासाठी स्टेशनवर पोहोचली. वडिलांच्या वयाचा प्रियकराला पाहून तिला धक्का बसला, तिने लगेच लग्नाला नकार दिला. यानंतर प्रियकराने तिला जबरदस्ती रेल्वेत बसून मोकामा येथे नेण्याचा प्रयत्न केला. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या दरम्यान तरूणीने टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बहिनीला फोन केला. परतली तेव्हा प्रियकरला तिच्यावर संशय आला. त्याने तिचा फोन हिसकावून घेतला आणि फोडून टाकला. भागलपूर स्टेशनवर गाडी पोहोचली तेव्हा तरूणीने पोलिसांना पाहून आरडाओरड सुरू केली. यानतंर प्रियकराला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मुलीच्या कुटुंबाला माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तरूणी आणि प्रियकर दोघांना एसएसपींच्या ताब्यात दिले.


वय आणि चेहरा लपवण्यासाठी व्हॉट्सअॅपवर नाही ठेवला डीपी...
वय आणि चेहरा लपवण्यासाठी कथित प्रियकराने आपल्या व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवला नव्हता. त्याने फेसबुक अकाउंटवर देखील आपला खरा फोटो टाकलेला नाही.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...