आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्यावर केला होता बलात्काराचा आरोप, त्याच्याशी तुरुंगात जाऊन केले तरुणीने लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमुई - बिहारच्या जमुई तुरुंगात सोमवारी एक अनोखे दृश्य पाहण्यास मिळाले. न्यायालयाच्या अादेशानंतर तुरुंगात असलेला कैदी व बलात्कार पीडितेचे लग्न लावून देण्यात आले. यासाठी तुरुंग प्रशासनाने तयारी केेली होती. तुरुंगातील मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार बलात्कार पीडिता व आरोपी व्यास पांडे यांचे लग्न लावून देण्यात आले. हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे.

 

तरुण-तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मुलीच्या पालकांना ही बाब समजली तेव्हा मुलावर लग्नासाठी दबाव टाकला. परंतु मुलाच्या पालकांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलाने लग्नास होकार दिला. आता दोघांचे शुभमंगल तुरुंगात लावून देण्यात आले आहे.तुरुंगातील अधिकारी -कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...