आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीच्या निर्णयासाठी 15 दिवस द्या : कुमारस्वामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीबद्दल दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्यावा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना बुधवारी केले.   


कुमारस्वामी यांनी बुधवारी येथे विविध शेतकरी संघटना आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना संबोधित करताना कुमारस्वामी म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे कठीण काम आहे. सरकार ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करेल. आमचे सरकार शेतकऱ्यांसोबत उभे राहील आणि त्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडणार नाही. राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे हित पाहणारे आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेही शेतकऱ्यांना मदत करण्यास आणि त्यांच्या आर्थिक समस्या दूर करण्यास इच्छुक आहेत.

 

मी राष्ट्रीय बँकांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कृषी कर्जाच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांनी सुविधांचा दुरुपयोग करू नये, हा सरकारचा मुख्य हेतू आहे. सरकारी योजनांबाबत येणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यासाठी मी दर महिन्याला शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...