आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू: दहशतवादी हल्ल्यादरम्यान एक अानंददायी घटना; एका मुलीस दिला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- सुंजवां येथे दहशतवादी हल्ल्यादरम्यान एक अानंददायी घटना घडली अाहे. गाेळीबारात जखमी झालेल्या गर्भवती महिलेने रात्रभर मृत्यूशी दाेन हात करत एका मुलीला जन्म दिला. शनिवारी गाेळीबाराचा अावाज एेकून रायफलमॅन नजीर अहमद यांची पत्नी शहजादा खान या घराबाहेर पडल्या हाेत्या; परंतु त्याच वेळी त्यांच्या कंबरेखालील भागाला एक गाेळी लागली. त्यांच्या विव्हळण्याचा अावाज एेकून शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना घरात अाेढले. त्यानंतर गर्भवती महिला जखमी झाल्याची सूचना मिळताच एक वाहन पाठवून शहजादा यांना रुग्णालयात हलवण्यात अाले. 


माेठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने गर्भातील मुलीच्या जीवाला धाेका निर्माण झाला हाेता. त्यामुळे गाेळी काढण्यासह डाॅक्टरांनी मुदतपूर्व प्रसूतीचा निर्णय घेतला. त्यानुसार रात्रभर दाेन शस्त्रक्रिया करण्यात अाल्या. प्रथम गाेळी काढण्यात अाली व नंतर सिझेरियन करण्यात अाले. मुलीचे वजन २.५ किलाेग्रॅम अाहे. तसेच शहजादा यांना अतिदक्षता विभागात, तर नवजात मुलीला एनअायसीयूमध्ये ठेवण्यात अाले अाहे. सध्या दाेघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात अाले. 

 

- अाई व मुलीचे प्राण वाचवण्यासाठी सैन्य रुग्णालयातील डाॅक्टरांनी रात्रभर प्रयत्न केले.
- मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रुग्णालयात जाऊन नवजात मुलगी व तिच्या अाईच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बातम्या आणखी आहेत...