आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापणजी - मुलींच्या दारुच्या वाढत्या नशेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर चिंतीत झाले आहेत. ते म्हणाले आता सहनशीलतेची मर्यादा संपत आली आहे. पर्रीकर म्हणाले, की गुन्हेगारांची धरपकड तोपर्यंत सुरु राहाणार आहे जोपर्यंत नशेचा हा धंदा पूर्णपणे संपत नाही. राज्य विधीमंडळ विभागाच्यावतीने आयोजीत राज्य युवा संसदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, गोवा पोलिसांनी ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु केल्यापासून आतापर्यंत 170 जणांना अटक करण्यात आली.
- महाविद्यालयीन युवती आणि तरुणींमधील वाढत्या नशेबद्दल चिंता व्यक्त करतांना ते म्हणले, मला विश्वास आहे की सर्वच त्यापैकी नाहीत. येथे उपस्थित असलेल्यांबद्दल मी बोलत नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
ड्रग्ज प्रकरणात कोर्टाची नरमाईची भूमिका
- पर्रीकर म्हणाले, एखाद्या आरोपीला पकडले तर त्याच्याकडे ड्रग्जचे प्रमाण कमी असेल तर त्याला 8 ते 15 दिवस आणि एक महिन्यात जामीन मिळून तो बाहेर येतो. आपले कोर्ट या प्रकरणात नरमाईचे धोरण स्वीकारत असले तरी किमान त्याला पकडले जात आहे.
'तरुणांना मेहनत करायची नाही'
- बेरोजगारांबद्दल पर्रीकर म्हणाले, सध्याचे तरुण हे कठोर मेहनत करत नाही. त्यामुळेच ते लोवर डिव्हिजन क्लर्क सारख्या पदांसाठी लांबच लांब रांगा लावतात.
- दुसरे असेही आहे की लोकांचा एक समज झालेला आहे की सरकारी नोकरी म्हणजे काही काम नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.