आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनशे वर्षे जुन्या लष्करी मशिदीत ‘ग्रीन इफ्तार पार्टी’; शाकाहारी पदार्थांवर भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - पूर्वीच्या त्रावणकाेर प्रांतातील व अाताच्या केरळच्या पलायममधील २०० वर्षे जुन्या सैन्य दलाच्या मशिदीत या वेळी ‘ग्रीन इफ्तार पार्टी’ साजरी केली जाते. ही या मशिदीची परंपरा व वैशिष्ट्य अाहे. ही मशीद राज्यकर्त्यांच्या मुस्लिम सैनिकांसाठी दोन शतकांपूर्वी बांधण्यात अाली हाेती. त्या वेळी घुमट वजा छत अशी संरचना असलेली ही एक छाेटीशी मशीद हाेती. कालांतराने त्यात काही बदल करण्यात अाले. एका हिंदू मंदिरालगत असलेल्या या मशिदीमध्ये मुस्लिम शाही सैन्याचे सदस्य नमाज पठण करत असत.  


केरळमधील राजधानीच्या शहरात सैन्य छावणीनजीक ईदगाह हाेते. पलायममधील अाताच्या या जुम्मा मशिदीत मुस्लिमांसह गैरमुस्लिम व धर्मनिरपेक्ष नागरिक  रमजानच्या महिन्यात एकत्र येऊन इफ्तार पार्टीत सहभागी हाेत असतात. दाेन धर्मांतील धार्मिक अडथळे कमी करत स्थानिक नागरिकांसह तेथून जवळच असलेल्या राज्य सचिवालयातील अधिकारी, वाहनचालक, व्यापारी, प्रवासी अादी या मशिदीत रमजान महिन्यात संध्याकाळी जमत असतात.  
पलायममधील ही जुम्मा मशीद कधीकाळी ‘पट्टलप्पाल्ली’ नावाने अाेळखली जात असे. या मशिदीत त्या काळी स्थानिक स्थिती व वातावरणानुसार परिवर्तन करण्यात अाले. शहराच्या मधाेमध असलेल्या या मशिदीत महिलांसाठीही प्रार्थना (नमाज) करण्याची व उपवास साेडण्याची साेय अाहे. ही मशीद सन १८१३मध्ये बांधण्यात अाली. तसेच १९६०च्या दशकात या मशिदीचा विस्तार करण्यात अाला, असे मशिदीचे मौलवी व्ही.पी.सुहैब यांनी सांगितले. 

 

रमजानमध्ये राेज पौष्टिक ‘कांजी’ने साेडतात उपवास   
रमजानमधील उपवास संपूर्ण शाकाहारी पदार्थ खाऊन साेडण्यात येतात. मशीद प्रशासनाने ‘ग्रीन इफ्तार’ ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले अाहे. केवळ इफ्तार पार्टीतच नव्हे, तर प्रत्येक दिवशी लापशीसारखा ‘कांजी’ हा एक अद्वितीय औषधी गुण असलेला पाैष्टिक पदार्थ तयार करून तो वाढला जातो. हा एक सात्त्विक पदार्थ असून, सुमारे ९०० ते १२००हून अधिक गैरमुस्लिमांसह इतर नागरिक हा पदार्थ खाण्यास येतात. तांदूळ, तूप, खजूर, लवंग, टमाटे, अद्रक, अननस, विलायची, दालचिनी अादी वस्तूंनी हा पदार्थ लाकडांच्या भट्टीवर तयार केला जाताे.   

 

बातम्या आणखी आहेत...