आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हेलिकॉप्टरने आलेल्या नवरीला पाहाण्यासाठी गावकऱ्यांची उडाली झुंबड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - राजधानी जवळील एका गावात नवरदेवाने हेलिकॉप्टरमधून नवरी आणल्यानंतर तिला पाहाण्यासाठी लहान-थोरांची गर्दी उसळली. नवरदेव गावातील प्रतिष्ठित परिवारातील असल्यामुळे संपूर्ण गावच नवरीच्या स्वागतासाठी हजर झाले. लहान-मोठ्यांपासून गावातील नवविवाहिताही घुंघटमधील नवरीला पाहाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. 

 

वऱ्हाड कारने गेले, नवरीला हेलिकॉप्टरने घेऊन आले 
- उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मधील मजरा राणी खेडा येथील लाल बहादुर यांचा ज्येष्ठ पुत्र मधुकर यादव याचे गुरुवारी इटावा येथे लग्न झाले. नवरदेव मधुकरसह वऱ्हाड बाय रोड गेले होते. 
- मधुकरला आपले वऱ्हाड हेलिकॉप्टरमधून घेऊन जायचे होते. त्यासाठी गावाच्या बाहेर हेलिपॅडही तयार करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानी दिली नाही त्यामुळे ते बाय रोड इटावाला गेले होते. 
- खूप विनवणी केल्यानंतर नव्या नवरीला घेऊन हेलिकॉप्टरमधून उतरण्याची परवानगी प्रशासनाने दिली. 
- शुक्रवारी जेव्हा आपल्या नव्या नवरीला हेलिकॉप्टरमधून घेऊन मधुकर गावात आला तेव्हा त्यांना पाहाण्यासाठी झुंबड उडाली होती. जणू नवरीच्या स्वागतासाठी संपूर्ण गावच आले होते. 

काय म्हणाले पोलिस अधिकारी 
- पोलिस अधिकारी म्हणाले, मधुकर यादवचा छोटा भाऊ माधवेंद्र यादव भू-माफियांच्या यादीत आहे. या लोकांविरोधात अनेक गुन्हेगारी खटले सुरु आहेत. 
- नवरदेवाचा भाऊ माधवेंद्र सिंहवर अनेक खटले असून एका ठिकाणी भूखंड बळकवण्याचा खटला ताजा आहे. या प्रकरणी त्याच्या साथीदारांकडे काडतूस सापडले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नवरदेव-नवरीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...