आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधी 1 कोटी रुपये आणि जॅग्वार मिळाली नाही म्हणून लग्नालाच आला नाही नवरदेव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद (हरियाणा) - हुंड्यासाठी लालची असलेल्या नवरदेवाने एक कोटी रुपये आणि जॅग्वार कारसाठी लग्नास नकार देण्याचा प्रकार येथे घडला. मुलीच्या कुटुंबीयांनी लाखो रुपये खर्च करण्याची पूर्ण तयारी केली होती. पण तरीही नवरदेव आलाच नाही. आता पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


51 लाख द्यायला तयार होते वधुपिता 
- फरिदाबादच्या खजान सिंह यांच्या मुलीचे लग्न दिल्लीच्या स्वप्निलबरोबर ठरले होते. लग्न ठरवताना एक कोटी रुपये किंवा जॅगवारबाबत काहीही बोलणे झाले नव्हते. 
- 20 जूनला वरातही येणार होती. 16 जूनला मुलीकडचे लोक साखरपुड्यासाठी दिल्लीला पोहोचले होते. 
- मुलीच्या बाजुच्या लोकांनी आरोप केला आहे की, नवरदेवाच्या कुटुंबीयांनी वरात आणण्यापूर्वी एख कोटी रुपये आणि जॅग्वार कारची मागणी केली. ही मागणी ऐकून मुलीचे कुटुंबीय घाबरून गेले. तरीही ऐपतीनुसार मुलीच्या वडिलांनी 51 लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. पण तरीही नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय ऐकले नाहीत. 
- अखेर 20 जूनला मुलगा लग्नासाठी वरात घेऊन आलाच नाही. 


कार देण्याचीही होती तयारी 
मुलीच्या नातेवाईकांपैकी एकाने सांगितले की, नवरेदव आणि त्याचे कुटुंबीय अडून बसले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी नाइलाजाने जॅग्वार देण्याचीही तयारी दाखवली. पण मुलाचे कुटुंबीय 1 कोटींवर अडून होते. मध्यस्थांनी अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. 

 

बातम्या आणखी आहेत...