आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवा भावजयीसोबत लावले अल्पवयीन दिराचे लग्न, चार तासाच दिराने केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत शिवधनचा भावजयीसोबत लग्नातील फोटो... - Divya Marathi
मृत शिवधनचा भावजयीसोबत लग्नातील फोटो...

परैया (गया, बिहार)- विधवा वहिनीशी जबरदस्तीने लग्न लावल्याचे अल्पवयीन दिराला पटले नाही. तो तिला आईसमान मानत होता. लग्न आणि पाठवणीनंतर अवघ्या ४ तासांतच त्याने गळफास घेतला. हा घटनाक्रम इतक्या वेगाने झाला की काय होते आहे याची कल्पना बहुतांश नातेवाइकांनाही आली नाही. ही घटना बिहारच्या परैया पोलिस ठाण्याच्या हद्दीत रमना बिनोवा गावातील आहे. सोमवारच्या घटनेची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली.  


यासंदर्भात माहिती अशी की, परैया येथील जमालपूरच्या देवी मंदिरात सोमवारी  झालेल्या पंचायतीत दुपारी १२ वाजता लग्नाचा निर्णय घेण्यात आला. दुपारी ४ वाजता लग्न लागले. पाठवणी सायंकाळी झाली. घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच म्हणजे रात्री ८ च्या सुमारास वराने गळफास घेतला. बापाने आपला तरुण मुलगा गमावला. पुनर्विवाह करणाऱ्या महिलेचे कुंकू दुसऱ्यांदा पुसले गेले.  


पोलिस ठाण्यामागेच घडले शोकनाट्य  
ज्या देवीच्या मंदिरात पंचायत झाली, लग्नही पार पडले ते स्थळ पोलिस ठाण्याच्या पाठभिंतीस लागून आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या घराच्या छतावरून सगळे काही दिसते. परंतु ही घटना पोलिस ठाण्यात समजलीच नाही. मंगळवारी सकाळी पोलिस ठाण्यात फिर्याद गेली आणि पोलिस महादेवच्या घरी पोहोचले. 


प्रकरण काय?
रमना बिनोवानगर येथील रहिवासी चंद्रशेखर दास यांना तीन मुले. मोठा सतीश दास याचा मृत्यू चार वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने झाला होता. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. मधला मुलगा मनीषचेही लग्न झालेले आहे. लहान मुलगा महादेव ऊर्फ शिवधनदास हा नवव्या वर्गात शिकतो. त्याचे वय १५ वर्षे इतके आहे. मोठ्या मुलाची विधवा रुबी देवीच्या माहेरची मंडळी तिचे दुसऱ्यांदा लग्न लावून देण्यासाठी ८० हजारांची मागणी करत होते. यासाठी ते सातत्याने दबाव आणत होते. इतकी रक्कम ते देऊ शकले नाहीत. यासाठी पंचायत बोलावण्यात आली. त्यांनी  जबरदस्तीने महादेवचे लग्न  विधवेशी लावले. यामुळे नाराज नवऱ्या मुलाने फाशी घेतली. 


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...