आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Chunav 2017 Narendra Modi Takes Sea Plane For Ambaji Darshan, नरेन्द्र मोदी सीप्लेन में करेंगे अंबाजी दर्शन

रोड शोची परवानगी न मिळाल्यामुळे नरेंद्र मोदींनी सी-प्लेनने केले उड्डाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद / नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी अहमदाबादेत रोड शो करण्याची परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा त्यांनी सी-प्लेनचा पर्याय निवडला. गुजरात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ते सी-प्लेनने साबरमती नदीवरून धरोई येथे दाखल झाले. तेथून रोड शोद्वारे ४५ किमी दूर अंतरावरील शक्तिपीठ  म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबाजी मंदिरात त्यांनी पूजा केली. सी-प्लेनने प्रवास करणारे मोदी देशातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. या सी-प्लेनमध्ये बसण्यासाठी नदीवर तरंगणारा प्लॅटफॉर्म बनवण्यात आला होता.

 

बहुधा जगातील कोणत्याही देशात निवडणूक प्रचारासाठी प्रथमच सी-प्लेनचा वापर करण्यात आला. भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी सांगितले, हे काही सामान्य विमान नव्हे तर गुजरातचा विकास दर्शवला जातो आहे. यावर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले, विकास की बाते उनको  न भाई, कहते हैं उनको हवा-हवाई. जनता त्रस्त व  मोदी मजेत अाहेत. 

 

१०० सी-प्लेन येणार, ११२ शहरे जोडली जाणार  

उड्डाण योजनेअंतर्गत अॅम्फियन म्हणजे सी-प्लेनमुळे ११२ छोटी शहरे व ग्रामीण भाग जोडला जाणार आहे. यासाठी अंदमान-निकोबार, टिहरी, राजस्थान, काठावरील व पूर्व भागासह १५ ठिकाणी अॅरोड्रमप्रमाणे वॉटरड्रम तयार करण्यात येईल. स्पाइस जेटने शनिवारी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून याची चाचणी घेतली हाेती. ही कंपनी जपानी कंपनीकडून १०० सी-प्लेन विकत घेणार आहे. एका सी-प्लेनची किंमत सुमारे २५ कोटी रुपये इतकी आहे. १०-१२ आसनी असलेले सी-प्लेन पाण्यात, रस्त्यावर आणि शेतात उतरू शकते. याचा वेग ताशी ३३९ किमी इतका आहे.  

 

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

माेदी जर सी-प्लेनने उड्डाण करू इच्छितात तर चांगली गोष्ट आहे. परंतु गुजरातच्या जनतेसाठी त्यांनी काय केले? येथे ३० लाख बेराेजगार आहेत. मंदिरात जाऊन गुजरातच्या जनतेचे भले व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

 
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

राहुल गांधी  संपूर्ण प्रचारात फक्त खोटेच बोलले आहेत. आम्ही सी-प्लेनच्या योजना आखत आहोत. तर काँग्रेस “सी-प्लॅन’ तयार करते आहे. गुजरातचा विकास मंदिरात जाऊन होत नसतो, असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला. 

 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला 

एक इंजिन असलेले विमान.  परदेशी पायलट. सुरक्षेसंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत काय? ज्याचे उल्लंघन आज झालेले नाही?

 

तरंगणारे प्लॅटफॉर्म बनवले होते
- रिव्हर फ्रंटवर सीप्लेनमध्ये मोदींना बसण्यासाठी तरंगणारे प्लॅटफॉर्म बनवण्यात आले होते. सीप्लेन आणि त्याचा पायलट जॉन अमेरिकी आहेत.

- मोदींनी सोमवारी एका सभेत सीप्लेनने अंबाजी मंदिरात जाणार असल्याविषयी माहिती दिली होती.

>मोदी म्हणाले होते- आपण प्रत्येक ठिकाणी एअरपोर्ट नाही उभारू शकत, यामुळे सरकारने सीप्लेन आणण्याची योजना बनवली आहे.

तथापि, सोमवारी प्रशासनाने मंगळवारी मोदींना रोड शोसाठी परवानगी नाकारली होती. लॉ अँड ऑर्डर आणि सामान्यांना होणारा त्रास ही कारणे यासाठी देण्यात आली होती.


कोण काय म्हणाले?
> भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ही साधारण फ्लाइट नाही. हे गुजरातेत विकासाचे प्रदर्शन आहे. माता साबरमतीत काठोकाठ भरलेले पाणी हेच दर्शवते की, गुजरातमध्ये सातत्याने विकासच झाला आहे. आतापर्यंत विकासाचाच विजय झाला आहे. 18 डिसेंबर रोजीही विकासच जिंकणार आहे.
> काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विटरवर लिहिले की, "‘विकास’ की बातें ऊनको न भाई, कहते हैं ऊनको ‘हवा-हवाई’। गुजरात की जनता परेशान, पर मेरा जीवन तो आलीशान।''
> हार्दिक पटेल म्हणाले, शेतकरी विमानाने शेतात कीटकनाशक टाकू शकतील, असे काही करा.

 

मोदींनी केले ट्विट
> मोदींनी मंगळवारी ट्विट करून सांगितले, मंगळवारी सकाळी मी अहमदाबादेत साबरमती नदी ते धरोई डॅमपर्यंत सीप्लेनने प्रवास करणार आहे. यानंतर अंबाजी मंदिरात अंबामातेचे दर्शन घेईन. हवाई, रोड आणि रेल्वे दळणवळणासोबतच आमचे सरकार जलमार्गाने प्रवासावर काम करत आहे. हे सर्व 125 कोटी भारतीयांसाठी केले जात आहे.


काय आहे सीप्लेन?
> सीप्लेन पाण्यावर लँड होऊ शकते. हे पाण्यावरूनच उड्डाणही घेऊ शकते.
> यातील एंफिबियस कॅटेगरीची विमाने पाण्यासोबतच जमिनीवरही लँड केले जाऊ शकतात.

जगभरात असे 200 एअरक्राफ्ट
> सेटोची होल्डिंग्ज QUEST ब्रँड अंतर्गत पाणी आणि जमिनीवर उतरणारे एअरक्राफ्टची निर्मिती करते. जगभरात मागच्या 10 वर्षांपासून असे तब्बल 200 Kodiak Quest एअरक्राफ्ट उड्डाण घेत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...