आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया, राहुलनी मला रावण, भस्मासुर संबोधले- मोदी; दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाभर/ तारापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मध्य गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. मोदींनी ४ व राहुल यांनी ३ सभा घेतल्या. मोदींनी नीच म्हणणारे व निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्यावरून संपूर्ण काँग्रेस पक्षावर हल्ला केला. सोनिया, राहुल, रेणुका चौधरी, जयराम रमेश, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ नेत्यांनी मला ‘मौत का सौदागर’, ‘माकड’, ‘रावण’, ‘भस्मासुर’, ‘हिटलर’ इत्यादी संबोधले होते. कपिल सिब्बल यांनाही पक्षातून निलंबित का करत नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला प्रश्न केला. त्यावर राहुल यांनीही पलटवार केला.

 

 

अय्यर माझी सुपारी देण्यासाठी पाकला गेले होते : मोदी
मला शिव्या ऐकण्याची सवय झालीये. मी पंतप्रधान बनलो तेव्हा अय्यर पाकिस्तानला गेले होते. तेथे त्यांनी मोदींना हटवले जात नाही तोपर्यंत भारत-पाक संबंध सुधारणार नाहीत, असे म्हटले होते. हटवण्याचा अर्थ काय होतो? मोदींची सुपारी देण्यासाठी पाकिस्तानला गेले होते काय ? ही गोष्ट काँग्रेसने दाबून का ठेवली ?

 

पुढील स्‍लाइड वाचा, आमच्यासाठी घाणेरडी भाषा वापरतात मोदी : राहुल...

बातम्या आणखी आहेत...