आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: मोदींनी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 19 सभा घेतल्या, उत्तर प्रदेशपेक्षा 6 पट जास्त सभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातच्या पहिल्या टप्प्यासाठी ८९ मतदारसंघांत आज मतदान होणार आहे. गुरुवारी सायंकाळी त्याचा प्रचार थंडावला होता. शुक्रवारपासून भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी प्रचारासाठी पूर्ण ताकदीनिशी स्वत:ला झोकून दिले आहे. शुक्रवारी मोदींनी ४ तर राहुल यांनी ५ जाहीर सभा घेतल्या. पहिल्या टप्प्यात दोन्ही पक्षांचा निवडणूक प्रचार व सभा पाहिल्यास या निवडणुकीने देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशलाही पिछाडीवर टाकले आहे.

 

पहिल्या टप्प्यात भाजपकडून पंतप्रधान मोदी यांनी आपला गड टिकवण्यासाठी ११ दिवसांत १९ जाहीर सभांचा धडाका लावला. अर्थात एका सभेद्वारे त्यांनी ४ ते ५ विधानसभा मतदारसंघांतील जनतेला मतांचे आवाहन केले. याच वर्षी उत्तर प्रदेशात  पहिल्या टप्प्यात ७३ जागा होत्या. गुजरातच्या तुलनेत या टप्प्यात जास्त मतदार होते. पण मोदींनी तीन सभा घेतल्या होत्या. 

 

आज पहिल्या टप्प्यामधील मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ जिल्ह्यांमधील एकूण ८९ जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. २०१२ मध्ये पहिल्या टप्प्यात ७०.७५% मतदान झाले होते. त्यात भाजपने ६३, काँग्रेसने २२ जागी विजय मिळवला होता. उर्वरित १४ जिल्ह्यांतील ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान होईल. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रचारसभांत मोदींनी अय्यर यांच्या ‘नीच’ शब्दावरून पुन्हा काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

 

हे ही वाचा,

सोनिया, राहुलनी मला रावण, भस्मासुर संबोधले- मोदी; दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात...

मोदींनी केला मनसुख यांचा उल्लेख, म्हणाले-अभिनंदन त्यांनी मनमोहन यांना सत्य सांगितले...

निवडणूक लढवणाऱ्या मंत्र्यांची एकूण संपत्ती 200 काेटी, 5 वर्षांत १ लाख ते 13 काेटींची वाढ...

सोनिया, राहुलनी मला रावण, भस्मासुर संबोधले- मोदी; दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात...

गुजरात : भाजपने जारी केले 'संकल्प पत्र', काँग्रेस सामाजिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप

मोदींनी केला मनसुख यांचा उल्लेख, म्हणाले-अभिनंदन त्यांनी मनमोहन यांना सत्य सांगितले...

 

पुढील स्‍लाइड वाचा, राहुल गांधी मोदींहून अग्रेसर आणि ३० केंद्रीय मंत्री, २५ ज्येष्ठ भाजप नेते, सुमारे १२० खासदार, २५० हून अधिक आमदार प्रचारात  व आणखी महिती...

बातम्या आणखी आहेत...