आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी सैनिकांकडून सीमेवर तोफांचा तुफान मारा; 4 दिवसांत 5 जवान शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी नौशेरा, राजौरी आणि अखनूर सेक्टरमध्ये उखळी तोफांचा तुफान मारा करत युद्धबंदीचे उल्लंघन केले. दरम्यान, अशाच हल्ल्यात जखमी झालेल्या एका भारतीय जवानाचे शनिवारी उपचारांदरम्यान प्राणेत्क्रमण झाले. त्यामुळे बुधवारपासून पाकच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान व मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे. यात सहा नागरिकांचा समावेश आहे. 


पहिल्या हल्ल्यात एक जवान व लहान मुलीचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी तीन नागरिकांचा मृत्यू झाला तर एक जवान शहीद झाला होता. दरम्यान, जम्मू, कथुआ आणि सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर मात्र तुलनेने शनिवारी शांतता होती.

बातम्या आणखी आहेत...