आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात हाॅटेलला अाग; पाच कर्मचाऱ्यांचा हाेरपळून मृत्यू ,70 वर्षे जुन्या हॉटेलमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- शहरातील एका ७० वर्षे जुन्या हाॅटेलला अाग लागून त्यात हाेरपळल्याने पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना साेमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कलसीपाल्य भागातील कुंभार संघाच्या इमारतीत घडली. या इमारतीत कैलाश बार अँड रेस्टाॅरंट अाहे. या हाॅटेलचे पाच कर्मचारी पहाटे साखरझाेपेत असताना अागीचे बळी ठरले. अग्निशमन दलाने तत्काळ परिसर माेकळा करून अाग नियंत्रणात अाणली. अागीचे कारण कळू शकले नाही, असे पाेलिसांनी सांगितले. तसेच गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी हाॅटेलमालकाला अटक करून गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...