आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळून गेलेल्या प्रेमी युगुलास काढले गावाबाहेर, हरियाणात पंचायतीचा अजब आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीचे आईवडील - Divya Marathi
मुलीचे आईवडील

पंचकुला - पंचकुलाच्या एका पंचायतीने तुघलकी फर्मान काढल्याचे निदर्शनास आले आहे. घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलास गावाबाहेर काढण्यात आले. जर दोघांपैकी कोणीही गावात परतले तर त्यांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल.

 

पंचकुला पोलिसांनी या फर्मानास पाठिंबाच दिला. परंतु पंचायतीने मुलीला सूट दिली व गावात परत बोलावून घेतल्याने, प्रकरणातील गुंता वाढला. परंतु प्रियकर दीपकची तडीपारी कायम ठेवण्यात आली होती. गेल्या ८ महिन्यांपासून तो गावाबाहेरच राहिला. १२ मे रोजी भावाच्या लग्नासाठी गावात परतला. आता पंचकुला प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

 

पिंजौर ब्लॉकमधील बुर्ज कोटियां येथे राहणारा तरुण दीपक आणि तरुणी ७ सप्टेंबर रोजी प्रेमप्रकरणातून पळून गेले होते. ८ सप्टेंबर रोजी दोघांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर लोकांनी त्यांना गावात आणले. गावात पंचायत बोलावण्यात आली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला होता.

 

निर्णयानंतर गावात परत येता येणार नाही
८ सप्टेंबर २०१७ रोजी कोटिया गावात पंचायत झाली. पंचायतीत सरपंच निषादसह गावातील लाेकांची उपस्थिती होती. गावातून आपल्या मर्जीने निघून जाणाऱ्या मुलास व मुलीला गावातून बाहेर काढण्याचा आदेश पंचायतीने दिला. ते गावात येऊ शकणार नाहीत. जर ते परत आले अथवा दोघांच्या कुटुंबातील लोकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना ५० हजार रुपये दंड करण्यात येईल.

 

१६ दिवसांनंतर तरुणासाठी निर्णय कायम, २० हजारांचा दंड वसूल करणार
या प्रकरणात २४ सप्टेंबर २०१७ नंतर मुलगी घरी परतली. त्यानंतर दुसऱ्यांदा पंचायत झाली. तेव्हा मुलीला गावात येण्याची सूट दिली. मात्र, युवकास गावात आयुष्यभर परत येता येणार नाही. मुलाच्या वडिलांनी २८ सप्टेंबरपर्यंत २० हजार दंड मुलीच्या वडिलांना द्यावा. या निर्णयानंतर दोन्ही पक्षांत भांडणे झाली तर जबाबदारी सरपंच निषाद यांनी घ्यावी.

 

बातम्या आणखी आहेत...