आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूर- कडाक्याच्या थंडीत शनिवारी रात्री जरौली येथे नाल्यातून एका तरूणीच्या ओरडण्याचे आवाज येऊ लागले आणि परिसरात एकच गोधळ उडाला. यानंतर लोकांनी तरूणीला नाल्यातून बाहेर काढले. परंतु, यानंतर तरूणीने हाय होल्टेज ड्रामा करण्यास सुरूवात केली.
नाल्याचा आतून येत होते आवाज...
बर्रा परिसरातील जरौली येथे एका रात्री रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांना नाल्यातून तरूणीच्या ओरडण्यचे आवाज येऊ लागले. लोकांनी नाल्याजवळ जाऊन पाहिले तेव्हा, आत एक तरूणी पडलेली दिसली. ती मदतीसाठी याचना करत होती.
10 फूट खोल होता नाला...
यानंतर लोकांनी तरूणीला 10 फूट खोल नाल्यातून बाहेर काढले. मुलीला कुठलीही दुखापत झाली नव्हती, परंतु, ती पूर्णपणे भिजली होती आणि तिच्या शरिरावर चिखल लागलेला होता.
तरूणीने केला ड्रामा...
लोक तरूणीच्या मदतीला धावले तेव्हा, तिने ड्रामा करण्यास सुरूवात केली. ती कधी आरडा-ओरड करत होती, तर कधी रडापड करत होती. लोकांनी तिच्याकडे निरखून पाहिले तेव्हा तिने खूप जास्त दारू पिलेली असल्याचे लोकांच्या लक्षात आले. तिला धड उभा देखील राहता येत नव्हते. एकदा उभी राहण्याचा प्रयत्न केला परंतु, ती जागीच कोसळली आणि झखमी झाली.
तरूणीला काहीच आठवत नाही...
विचारपूस केल्यानंतर तरूणीने सांगितेल की, ती शुक्लागंज येथील रहिवाशी आहे आणि आपल्या मित्रांसोबत पार्टीमध्ये गेली होती. परंतु, पार्टीनंतर ती येथे कशी पोहोचली आणि नाल्यात कशी पडली याविषयी तिला काहीच आठवत नाही.
वडिल म्हणाले...
तेथे उपस्थित लोकांनी तरूणीचा मोबाईल घेऊन तिच्या वडिलांना कॉल केला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा वडिलांनी सांगितले की, माझी मुलगी बाजारात जाण्यासाठी घरातून निघाली होती, परंतु, बर्रा येथे कशी पोहोचली याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही.
3 वर्षांपूर्वी झाला तरूणीचा घटस्फोट...
असे सांगण्यात येत आहे की, पाच वर्षांपूर्वी तरूणीचे दिल्लीत लग्न झाले होते. परंतु, तीन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. यानंतर ती माहेरी राहत आहे.
पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.