आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्चबिशप यांच्या वक्तव्याचा हिंदू संघटनांनी केला निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी -  गोव्याचे आर्चबिशप फादर फिलिप नेरी फेराओ यांनी केलेल्या ‘भारतीय राज्यघटना धोक्यात आहे’, या वक्तव्याचा अनेक हिंदू संघटनांनी गुरुवारी निषेध केला. आर्चबिशप यांनी गेल्या रविवारी ख्रिश्चनांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, ‘आज भारतीय राज्यघटना धोक्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश लोक असुरक्षिततेच्या भावनेने जगत आहेत. सार्वत्रिक निवडणूकही जवळ आली आहे. या पृष्ठभूमीवर आपण सर्वांनी राज्यघटना चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची आणि तिचे संरक्षण करण्यासाठी कठोर काम करण्याची गरज आहे.’  


रामनाथी येथे आयोजित सातव्या अखिल भारतीय हिंदू परिषदेच्या अखेरच्या दिवशी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था या संघटनांनी आर्चबिशपच्या निषेधाचा ठराव मंजूर केला. या सहा दिवसांच्या परिषदेला १८ राज्यांतील १७५ संघटनांचे ३७५ पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पत्रकारांना ठरावाची माहिती देताना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, सामाजिक सद्भाव आणि राष्ट्रीयत्व याबाबत फेराओ यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. धार्मिक संस्थांनी भारतीय राज्यघटनेच्या विरोधात अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे चुकीचे आहे.  गोवा सरकारने श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना राज्यात केलेली प्रवेशबंदी घटनाविरोधी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून राजहंस म्हणाले की, ही प्रवेशबंदी तत्काळ उठवण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. मुतालिक यांनी या बंदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्यघटनेनुसार प्रत्येकाला देशात फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. मुतालिक यांना प्रवेशबंदी हा राज्यघटनेचा अपमान आहे.  

 

विदेशी पर्यटकांच्या गुन्ह्याबाबत बोलायला हवे होते : राजहंस 
राजहंस म्हणाले की, आर्चबिशप यांनी गोव्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांकडून होणाऱ्या गुन्ह्यांबाबत बोलायला हवे होते. रशियन, नायजेरियन लोक गोव्यात येतात आणि अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गुन्ह्यांत सहभागी असतात. नायजेरियन, रशियन आणि युरोपियन पर्यटकांच्या कारवायांमुळे गोव्याला आणि गोव्याच्या संस्कृतीला खरा धोका आहे.  आर्चबिशप यांनी आपल्या पत्रात त्याविरोधात काही बोलायला हवे होते, पण वस्तुस्थिती अशी आहे की, आर्चबिशप त्याविरोधात ब्र शब्दही काढणार नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...