आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील त्राल पोलिस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, बुरखा घालून पळून जाणारा हिजबूलचा दहशतवादी ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - साऊथ काश्मीरमधील पुलवामा येथे हिजबूल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला सोडवण्यासाठी त्राल पोलिस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या संधीचा फायदा उठवत एक दहशतवादी बुरखा घालून पळाला असताना एक ग्रेनड त्याच्या जवळ फुटला त्यात दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 24 तासांत दहशतवाद्यांनी तिनवेळा पोलिसांना लक्ष्य केले आहे. 

 

दहशतवाद्याला सोडवण्यासाठी हल्ला 
- जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की हिजबूल दहशतवाद्यांनी तुरुंगात कैद असलेल्या साथीदाराला पळवण्याचा प्लान बनवला होता. ठरलेल्या प्लाननुसार दहशतवाद्यांनी सोमवारी दुपारी पोलिस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर ग्रेनेड हल्ला केला. 
- ग्रेनेड हल्ल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली त्याचा फायदा उचलत दहशतवादी मुश्ताक अहमद चोपन याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. 
- पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने बुरखा घातला होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, तेव्हाच पोलि स्टेशनबाहेर आणखी एक ग्रेनड फेकला गेला आणि तो दहशतवाद्याजवळच फुटला. यात त्याचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...