आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

divyamarathi.com विशेष : वाचा काय सांगताहेत निपाहचा शोध लावणारे शास्त्रज्ञ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- वटवाघूळ ताडी सारख्या गोड पदार्थांकडे लवकर आकर्षित होत असतात. 

- ताजी ताडी झाडावरून भांड्यात पडत असताना वटवाघळे तिला संक्रमित करतात. 

 

नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम-केरळात निपाह व्हायरसमुळे एका आठवड्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 17 जणांना त्याची लागण झालेली आहे. असे म्हटले जात आहे की, केरळमध्ये हा व्हायरस पाण्याच्या विहिरी, वटवाघळांनी खाल्लेली फळे आणि ताडीद्वारे पसरला आहे. पण हा व्हायरस केरळला कसा पोहोचला? यावर लस का उपलब्ध नाही? डिसेंबर आणि मेमध्येच हा का सक्रिय होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी 'भास्कर'ने मलेशियाचे प्रोफेसर चुआ कॉ बिंग आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीफन लुबी यांच्याशी संपर्क केला. प्रोफेसर बिंग यांनी 1999 मध्ये सर्वात आधी मलेशियामध्ये या व्हायरसचा शोध लागला होता. ते गेल्या 10 वर्षांपासून यावर रिसर्च करत आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा सारांश येथे देत आहोत.

 

निपाह व्हायरस केरळमध्येच का समोर आला?
प्रोफेसर लुबी :
निपाह दक्षिण आशियात आढळणाऱ्या एका मोठ्या आकाराच्या वटवाघळामुले पसरतो. त्याला इंडियन फ्रूट बॅट म्हणजे पळभक्षी वटवाघूळ म्हटले जाते. दक्षिण भारतातील राज्यांत आणि विशेषतः केरळमध्ये यांची संख्या अधिक असून ते श्रीलंकेपर्यंत पसरले आहेत. केरळमधून मिळालेल्या माहितीनुसार त्याठिकाणी ही वटवाघळेच या व्हायरसचा प्रसार करत आहेत. त्यावर आणखी संशोधन व्हायचे आहे. 


मग हा व्हायरस पसरवणार्या वटवाघळाचा मृत्यू का होत नाही?
प्रोफेसर लुबी :
रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या या फळभक्षी वटवाघळाच्या शरिरात एक विशेष प्रकारचे अँटिबॉडी असते. त्यामुळे निपाहचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. हा व्हायरस वटवाघळाच्या शरिरात शांतपणे पडून असतो. त्याला शेडिंग म्हणतात. जेव्हा हे वटवाघूळ एखादे फळ खाते किंवा एखादे पेय पिते तेव्हात त्यात या व्हायरसचे संक्रमण होते. वटवाघळाच्या मलमुत्राद्वारेही इतर जीव आणि विशेषतः सस्तन प्राण्यांना त्याची लागण होते. याची लागण झाल्यानंतर विचित्र प्रकारचा ताप येतो त्यावर वेळीच उपचार मिळाल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. 


म्हटले जाते की, केरळमध्ये हा व्हायरस फळांमुळे पसरला, पण अशी कोणती फळे आहेत जे खाल्ल्यामुळे धोका होऊ शकतो?
प्रोफेसर लुबी :
फळे ही बहुतांश लोकांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे त्यातीन लवकर लागण होते. पण प्रत्येकवेळी फळातूनच लागण होईल असेही गरजेचे नाही. बांगला देशात जेव्हा हा व्हायस पसरला होता, तेव्हा कच्ची ताडी प्यायल्याने तो पसरला होता. मला वाटते की, केरळमध्ये फळांपेक्षा ताडी हाच व्हायरस पसरण्याचा मुख्य स्त्रोत आहे. 


कच्ची ताडी आणि या व्हायरसचा संबंध काय?
प्रोफेसर लुबी :
केरळमध्ये काही अशा लोकांनाही लागण झाली होती, जे कच्ची ताडी प्यायले होते. वटवाघळे कच्च्या ताडीसारख्या गोड पदार्थांकडे लवकर आकर्षित होतात. वटवाघळे रात्री निघतात आणि जेव्हा ताडी झाडावरून भांड्यात पडत असते त्यावेळी ते ताडी पित असतात. तेव्हाच त्यांच्या शरिरातील व्हायरस ताडीत प्रसारीत होतो. 


या व्हायरसमुळे येणाऱ्या तापावर अद्याप लस का शोधता आलेली नाही?
प्रोफेसर लुबी :
लस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागत असतो. निपाह व्हायरसच्या संक्रमण झाल्याचे प्रकार प्रामुख्याने मलेशिया, भारत आणि बांग्लादेशात पाहायला मिळाले आहेत. कदाचित याच कारणामुळे अगदी कमी भागाशी संबंधित हा विषय असल्याने त्याची लस तयार करण्यासाठी मोठे बजेट ठेवण्यात आलेले नाही. पण नुकतीच याची लस तयार करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी कोएलिशन फॉर इपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन्स (सीईपीआय) नावाची संघटना निधी गोळा करण्यासाठी काम करत आहेत. 


निपाहचा प्रभाव डिसेंबर आणि मे महिन्यांतच सर्वाधिक का जाणवतो?
प्रोफेसर लुबी :
या काळात सर्वाधिक प्रभाव दिसण्याचे कारण म्हणजे याच काळात ताडी सर्वाधिक तयार होते. गरमी आणि आर्द्रतेमुले या काळात वटवाघळे ताडीच्या वासाकडे आकर्षित होतात आणि ती ताडी पितात. जेव्ही या प्राण्याची ही उष्टी ताडी एखादा व्यक्ती पितो तेव्हा त्यालाही याचे संक्रमण होते. 


आतापर्यंत निपाह व्हायरसमध्ये तुम्ही काय बदल पाहिला आहे?
प्रोफेसर लुबी :
आतापर्यंत जी प्रकरणे समोर आली आहेत, तिच्यानुसार या व्हायरसमध्ये काहीही बदल पाहायला मिळालेला नाही. व्हायरसचा जो स्ट्रेन मलेशियामध्ये आढळून आला होता तोच बांगलादेशमधील प्रकरणे समोर आल्यानंतरही पाहायला मिळाला होता. पण रुग्णांमध्ये याबाबत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. केरळमध्ये अद्याप या दिशेने काम करण्यात आलेले नाही.


संक्रमणापासून वाचण्यासाठी काय काळजी घेणे गरजेचे आहे?
प्रोफेसर लुबी :
सर्वात गरजेचे म्हणजे कच्ची किंवा प्रक्रिया केलेली कोणतीही ताडी प्यायला नको. संक्रमण किंवा लागण झालेल्यांपासून दूर राहा. काही कारणांमुळे अशा लोकांच्या संपर्कात आलेच तर मेडिकेटेड साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. 


पुढे वाचा, निपाहविषयी UPDATE 

बातम्या आणखी आहेत...