आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावायाचे होते भावाच्या सालीसोबत अनैतिक संबंध, पत्नीला विजेचे झटके देऊन केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनेश रजक आणि त्याची 24 वर्षाची मृत पत्नी नेहा - Divya Marathi
दिनेश रजक आणि त्याची 24 वर्षाची मृत पत्नी नेहा

भागलपूर (बिहार)- येथील एका अलआयसीची आधिकाऱ्याने आपल्या पत्नीला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृत महिलेचा मृतदेह जमीनीवर पडलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि हातांवर जखमांचे निशान होते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


हत्येनंतर मासे घेण्यासाठी निघाला, दोन तासांनी परतला...
एलआयसीच्या भागलपूर विभागातील ऑफिसचे सीईओ दिनेश रजक आणि त्याची 24 वर्षाची पत्नी नेहा संप्रीति आपार्टमेंटमध्ये राहत होते. पोलिसांनी सांगितले की, सुरूवातीला केलेल्या चौकशीत दिनेशने मनाने खोटी कथा रचून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. हत्येला अपघात बनवण्यासाठी त्याने पूर्ण प्रयत्न केले. दिनेश पत्नीची हत्या करून रविवारी सकाळी साडे 9 वाजता मासे आणण्यासाठी निघून गेला. दोन तासांनी साडे 11 वाजता घरी परतला, त्याने दरवाजाही वाजवला. दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पत्नी औषधी घेऊन झोपली असेल असे सांगत त्याने पाच तास दरवाजा उघडण्याची वाट देखील पाहिली.


संध्याकाळी 4:45 वाजता तोडला दरवाजा....
मार्केटमधून खरेदी करून आल्यानंतर आरोपी दिनेश पाच तास घराबाहेरच फिरत होता असे सांगण्यात येत आहे. या दरम्यान त्याने सासरी फोन करून दरवाजा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर एक जवळच राहणारा साला घरी पोहोचला आणि संध्याकाळी 4:45 वाजता दोघांनी मिळून घराचा दरवाजा तोडला, तेव्हा आत नेहाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि मृत नेहाच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपांवरून पती दिनेश रजकला पोलिसांना ताब्यात घेतले आहे.


आडीच वर्षापूर्वी झाले लग्न, कुरूप म्हणून हिनवत होता पती...
नेहाचे वडिल कैलाश रजक यांनी सांगितले की, त्यांची मुलगी लग्नानंतर टीएनबी कॉलेजमथून पीजी करत होते. आडीच वर्षांपूर्वी तिचे लग्न दिनेशशी झाले. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच, कुटुंबीय भागलपूरला आले. नेहाच्या वडिलांनी जावाई त्याची भावजई आणि भावावर तीन गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, नेहाच्या सासरचे हुंड्यावरून तिचा छळ करत होते. नेहाला सतत त्रास देण्यात येत होता. तिला कुरूप म्हणून देखील जावाई दिनेश हिनवरत होता. एवढेच नाही तर त्याचे आपल्या भावजईच्या बहिनीसोबत अनैतिक संबंध होते आणि यामुळे त्याने नेहाची हत्या केली असा आरोप देखील नेहाच्या वडिलांनी केला आहे. 


घटनेची माहिती मिळाताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. डीएसपी रमेश कुमार यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींची चौकशी सूरू आहे. पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...