आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने BF सोबत मिळून केले पतीचे 4 तुकडे, फेकले चार ही दिशेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्णिया- बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक महिला प्रेमात एवढी वेडी झाली की, तिने आपल्या पतीच्या शरीराचे चार तुकडे केले. नंतर मृतदेहाचे चारही तुकडे वेगवेगळ्या दिशेला फेकून दिले. घटनेच्यादिवशी महिलेने आपल्या प्रियकराला बेडरूमध्ये लपवले होते. पोलिसांनी शुक्रवारी आरोपी सुमन देवी आणि तिच्या प्रियकर दिनेशला अटक केली आहे. 

 

माहेरी राहणाऱ्या तरूणावर होते प्रेम...
मृत गोपाल चौरसियाची पत्नी सुमन देवी आपल्या माहेरच्या दिनेशवर प्रेम करत होती. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याविषयी काही दिवसांपूर्वी गोपालला कळाले होते. यानंतर त्याने पत्नीवर बंधन टाकण्यास सुरूवात केली. ही गोष्ट त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला आवडली नाही. दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याची योजना आखली आणि गोपलची हत्या केली.

 

प्रियकरासोबत मिळून आधी कापला गळा...
पोलिस अधिकारी अरविंद कुमार यांनी सांगितले की, चौकशी दरम्यान दोघांनी हे स्विकारले आहे की, सोमवार रात्री उशीरा गोपाल आपल्या घरी परतला. रोजच्या प्रमाने त्याने सर्व काम संपवले आणि झोपण्यासाठी आपल्या बेडरूमध्ये गेला. काही वेळानंतर तो गाढ झोपी गेला. हीच संधी साधून सुमन आणि प्रियकर दिनेशने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. या हल्यात गोपालचा गळा कापून धडावेगळा करण्यात आला.  यानंतर दोघांनी मृतदेहाचे चार तुकडे केले.


मृतदेहाचे तुकडे चारी दिशांना फेकले...
- सुमनने पोलिसांना सांगितले की, शरीराचे डोके आणि पाय सरोचिया गावात पोखमध्ये टाकून दिले, तर उरलेले तुकडे सौचालयाच्या टाकीत टाकले होते. पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणाहून मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेण्यात आले आहेत.


सुमनने सासूची देखील विष देऊन केली होती हत्या...
गोपाल चौरसियाची पत्नीने आधी देखील अशी एक हत्या घडवून आणली होती. सुमनने सासूसोबत असलेल्या मतभेदातून तिच्यावर विषप्रयोग करून तिची हत्या केली होती. 


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...