आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा रेप करण्यासाठी घरता घुसला, विरोध करणाऱ्या पतीचे नाक दाताने कापून केले वेगळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धौलपूर/सरमथुरा- येथील रोलीगावात बलात्कार कऱण्यासाठी घरात शिरलेल्या युवकाने महिलेच्या पतिचे नाक दातांनी कापून वेगळे केले. एवढेच नाही, तर महिलेच्या हाताला देखील चावा घेऊन जखमी केले. यानंतर आरोपी, त्याची आई आणि चुलत भाऊ यांनी पीडित कुटुंबीयांना जिवे मराण्याची धमकी दिली आणि आणि त्यानंतर रात्रभर घराच्या बाहेर पहारा दिला. मोठ्या मुस्कीलीने कुटुंबीय घरातून निघाले आणि 16 किमी जंगलांतून चालून शनिवारी सकाळी धौलपूर येथे पोहोचले.


पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री साडे 10 वाजता खरोली येथील चेनू नावाचा तरूण गावातील शेजारच्या एका घरात चाकू घेऊन गैरवर्तन करण्याच्या इराद्याने शिरला.
- घरात झोपलेल्या माहिलेला उठवले आणि चाकूचा धाक दाखवून जमीनीवर झोपण्यास सांगतिले.
- महिलेने सांगितले की, आरोपी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे महिलेने आरडाओरड करण्यास सुरूवात केली आणि त्याच्याशी दोन हात केले. 
- या दरम्यान महिलेचा पती जागी झाला आणि त्याची युवकाशी झटापट सुरू झाली. पती-पत्नी दोघांशी झगडताना आरोपी त्यांच्यासमोर करमजोर पडला. तो सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागला. या प्रयत्नात त्याने महिलेच्या पतीच्या नाकाचा चावा घेऊन अर्धे नाक वेगळे केले. यामुळे रक्तभंबाळ झालेल्या पतीने त्याला सोडून दिले.
- यानंतर महिलेच्या हाताचा चावा घेऊन आरोपी युवक तेथून फरार झाला.
- घटनेच्यानंतर 20 मिनिटांनी आरोपीने आपल्यासोबत पत्नी गुड्डी, लक्ष्मण यांना सोबत घेऊन लाठ्याकाठ्यासह पीडित कुटुबांच्या घऱी पोहोचला.
- येथे पीडित कुटुंबीयांना अभद्र भाषेत शिविगाळ केली आणि तक्रार दाखल केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. 


पोलिसांना पाहून लपला आरोपी...
- पीडित कुटुबीयांनी एसपीची भेट घेतली. रात्री घडलेल्या संपूर्ण घटनेची त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावरून आरोपी चेनूला अटक कऱण्यात आली आहे.
- पोलिस अधिकारी पूरनमल यादव यांनी सांगितले की, पोलिसांना पाहून आरोपी लपला होता. पोलिस तसेच परतले. यानंतर आम्ही काही पोलिस कर्मचाऱ्यांना अर्ध्या रस्त्यातून बाइकवरून परत पाठवले
- याच दरम्यान आरोपी गावातील रस्त्यावरून जात असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून तो पळू लागला, तेव्हा जवानांनी त्याचा पठलाग करून त्याला ताब्यात घेतले.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...