आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये कांदा व लसूण खाण्यासाठी पत्नीवर पतीचा दबाव, गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील गांधीनगर येथे एका महिलेने पती व सासूच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्यावरून व मारहाण केल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संतेज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती स्वामीनारायण संप्रदायाच्या विचारांना मानते. पती रौनक पटेल जबरदस्तीने तिला कांदा व लसणापासून बनवलेले पदार्थ खाण्याची सक्ती करतो. तिने नकार दिल्याने सासू व नवरा दोघेही मारहाण करतात, असे तक्रारीत म्हटले आहे. तिला माहेरच्या नातेवाइकांशी बोलण्यास बंदी घातली आहे.


पोलिसांनी सांगितले, महिलेचा विवाह चार वर्षापूर्वी झाला. ती एका खासगी कंपनीत काम करते. तर पती पानपट्टीचे दुकान चालवतो. पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून पती व सासू विरोधात मारहाण व धार्मिक भावना दुखावल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...