आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई अॅडव्हान्सचा निकाल 11.69% हरियाणाचा प्रणव देशात पहिला, तर मुलींमधून मीनलची बाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/कोटा - जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा रविवारी निकाल घोषित करण्यात आला. या वर्षी आयआयटीत २९१ जागा वाढलेल्या असताना काउन्सेलिंगसाठी केवळ १८,१३८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यात २०७६ विद्यार्थिनी आहेत. एकूण १ लाख ५५ हजार १५८ विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्स परीक्षा दिली होती. चंदीगडच्या पंचकुलातील प्रणव गोयलने ३६० पैकी ३३७ गुण पात्र करून देशात पहिला क्रमांक मिळवला. कोटातील साहिल जैनने ३२६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. दिल्लीचा कलश गुप्ता तिसऱ्या स्थानी राहिला. 


कोटाच्या मीनल पारखने ३१८ गुण प्राप्त करून सहावे स्थान मिळवले. मुलींमध्ये मीनल पहिली आली. जेईई अॅडव्हान्स परीक्षा पहिल्यांदा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. ११.६९% विद्यार्थी आयआयटीच्या ११ हजार २७९ जागांसाठी काउन्सेलिंगकरिता पात्र ठरले. अॅडव्हान्सच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात कमी संख्या आहे. या वेळी एका जागेसाठी केवळ १.६० विद्यार्थ्यांना काउन्सेलिंगसाठी बोलावण्यात आले. मागील वर्षी आयआयटीच्या १० हजार ९८८ जागांसाठी ५० हजार ४५५ विद्यार्थी काउन्सेलिंगसाठी पात्र ठरले. मागील वर्षी एका जागेसाठी ४ विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले. काउन्सेलिंग १५ जूनपासून सुरू होईल. 

 

सुपर ३० चे २६ विद्यार्थी
पाटणातील सुपर ३० संस्थेतील २६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. निकालानंतर आनंद कुमार यांनी सुपर ३० ची व्याप्ती वाढवण्याची गरज व्यक्त केली. देशातील विविध भागात लवकरच परीक्षा घेऊन मुलांची निवड केली जाणार असून वेबसाइटवर त्याची माहिती दिली जाईल. संस्थेकडून मागील १६ वर्षांपासून मुलांची आयआयटी प्रवेशासाठी तयारी करून घेतली जाते. 

 

असा आहे ‘कट ऑफ’  
आयआयटीने घोषित केलेल्या ३५% च्या कटऑफमध्ये बदल केलेला नाही. जनरल कट ऑफ १२६, ओबीसी ११४, एससी, एसटी कट ऑफ ६३ गुणांवर राहिले. मागील वर्षीही कट ऑफ ३५ टक्क्यांवर होते. 

 

बातम्या आणखी आहेत...