आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीर सोमनाथमध्ये बेकायदेशीर Lion Show, कोंबडा लटकवून सिंहीणीला दिला त्रास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरसोमनाथ - गिरगड्ढामधील जंगलात कोंबड्याचे आमीष दाखवत सिंहीणीला त्रास देण्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. 32 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये काही जण झाडावर कोंबडा लटकावून सिंहींणीला त्रास देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडिओ समोर आला होता. फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा लोकांवर नजर ठेवून आहेत. गेल्या महिन्यात अशाच प्रयत्नात 7 जणांना अटकही करण्यात आली होती. काही रिसॉर्ट्स पैसे घेऊन अशा प्रकारांना खतपाणी घालत असल्याचीही चर्चा आहे. 


गिरगड्ढाच्या आसपासच्या रिसॉर्टवर बेकायदेशीररित्या लॉयन शो होत असल्याचे चित्र आहे. या नव्या व्हायरल व्हिडिओमध्ये 2 जण झाडांवर कोंबडा लटकावून काही अंतरावर उभे राहिले आहेत. पण जेव्हा एक सिंहीण कोंबडा पकडण्यासाठी येते तेव्हा दोरीने कोंबडा वर ओढला जातो. त्यामुळे सिंहीण चिडल्याचे स्पष्ट दिसते. 


काही दिवसांपूर्वीही एक असा व्हिडिओ समोर आला होता. फॉरेस्टमध्ये रात्रीच्यावेळी पार्टीदरम्यान अशाचप्रकारे एखा सिंहीणीला कोंबडा दाखवून त्रास देण्यात आला होता. जेव्हा सिंहीण आक्रमक झाली तेव्हा लोकांनी तिला कोंबडा दिला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...